गुरव समाजातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे : पाथरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:56+5:302021-02-06T04:40:56+5:30
महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारणाबरोबरच राजकारणात यश मिळवावे, असे आवाहन गुरव समाज महिला जिल्हाध्यक्षा वर्षा पाथरकर यांनी केले. अक्कलकोट येथे ...
महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारणाबरोबरच राजकारणात यश मिळवावे, असे आवाहन गुरव समाज महिला जिल्हाध्यक्षा वर्षा पाथरकर यांनी केले.
अक्कलकोट येथे गुरव समाज महिला मंडळ हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती फुलारी, जिल्हा उपाध्यक्ष करुणा गुरव, तालुकाध्यक्ष शीलवंती बनजगोळे, उपाध्यक्ष रोहिणी फुलारी उपस्थित होत्या. याप्रसंगी ज्योती फुलारी आणि रोटरी क्लबचे चार्टर सेक्रेटरी स्वामिराव गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. काशिनाथ गुरव महाराज यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन करुणा गुरव यांनी केले, तर आभार भौरम्मा गुरव यांनी मानले.
उपस्थित महिलांना संक्रांतीचे सौभाग्यवाण देऊन हळदीकुंकवाचा मान देण्यात आला. यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
फोटो
०५अक्कलकोट-गुरव समाज सत्कार
ओळी
अक्कलकोट येथे गुरव समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्या ज्योती फुलारी यांचा सत्कार करताना वर्षा पाथरकर, करुणा गुरव, शीलवंती बनजगोळे, रोहिणी फुलारी आदी.