महिलांनी कौटुंबिक संवाद वाढविण्याची गरज, राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:49 AM2018-03-17T11:49:05+5:302018-03-17T11:49:05+5:30
स्वयंशिक्षण प्रयोग, उमेद सोलापूरच्या वतीने व्यावसायिक महिलांचा गौरव
सोलापूर : शहरी आणि ग्रामीण भागातून दुय्यम साधनांमुळे कौटुंबिक संवाद घटत आहे़ संवाद वाढला तर महिला आणखीन पुढे जातील़ कुटुंबातून प्रोत्साहन मिळेल़ हा संवाद वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी केले़
स्वयं शिक्षण प्रयोग आणि उमेद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला़ तसेच यावेळी व्यावसायिक क्षेत्रातील महिलांचाही गौरव करण्यात आला़ याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले़ शुक्रवारी दुपारी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास ग्रामीण जीवनोन्नतीचे गट सहायक अधिकारी अनिल नेवाळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी विविध क्षेत्रांतील २० महिलांना उत्कृष्ट व्यावसायिक महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ तसेच आठ महिलांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले़ प्रास्ताविक प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत माळवदकर यांनी केले़
डॉ़ भारुड पुढे म्हणाले की, स्वयं शिक्षण प्रयोग आणि उमेद सोलापूर यांच्या माध्यमातून महिलांचा खºया अर्थाने विकास होत आहे़ यांच्या माध्यमातून भविष्यात या महिलांचे आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण झाले पाहिजे़ शासनाने बचत गटाच्या माध्यमातून एक ताकद मिळवून दिली आहे़ त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळवून दिली आहे़
सूत्रसंचालन किरण माने यांनी केले तर आभार समन्वयक काका आडसुळे यांनी मानले़ यावेळी प्रभाग समन्वयक रेश्मा कांबळे, शशिकांत वाघमारे, तुषार चव्हाण, शामल गुरव, मंगल धुमाळ, जिल्हा नियोजन मंडळाच्या रेश्मा राऊत, दिनेश क्षीरसागर आदी उपस्थित होते़
बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन
च्याप्रसंगी बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते़ या प्रदर्शनात महिलांनी बनविलेल्या भाकरी, शेंगा चटणी, वडापाव, भेळ, मठ्ठा, स्टेशनरी साहित्य, कपडे असे विविध वस्तूंचे १५ स्टॉल थाटले गेले होते़़ या स्टॉलचे उद्घाटन डॉ़ राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झाले़ मोहोळ, बार्शी, नान्नज, वडाळा, अंत्रोळी, कोळेगावसह विविध गावांतून जवळपास १५०० महिलांनी उपस्थिती दर्शविली़