महिला सरपंच पाहणार ५७ गावांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:22+5:302021-02-23T04:34:22+5:30

यामध्ये अनुसूचित जमाती : तारापूर, अनुसूचित जाती : पोहोरगाव, सुगाव खुर्द, खरसोळी, पळशी, चळे, मेंढापूर, सुस्ते, आंबे चिंचोली, सोनके, ...

Women Sarpanch will look after 57 villages | महिला सरपंच पाहणार ५७ गावांचा कारभार

महिला सरपंच पाहणार ५७ गावांचा कारभार

Next

यामध्ये अनुसूचित जमाती : तारापूर, अनुसूचित जाती : पोहोरगाव, सुगाव खुर्द, खरसोळी, पळशी, चळे, मेंढापूर, सुस्ते, आंबे चिंचोली, सोनके, बार्डी आदी १० गावांचा समावेश आहे. नामाप्र : जाधववाडी, लोणारवाडी, शिरगाव, आढीव, नारायण चिंचोली, खरातवाडी, गोपाळपूर, कोर्टी, ईश्वरवठार, बोहाळी, उपरी, नांदुरे, करकंब आदी १३ गावे, सर्वसाधारण : कान्हापुरी, करोळे, सांगवी, बादलकोट, पटवर्धन कुरोली, वाडीकुरोली, भोसे, देवडे, चिलाईवाडी, गुरसाळे - वेणुनगर, खेडभाळवणी, धोंडेवाडी, भाळवणी, टाकळी, अजनसोंड, बिटरगाव, मुंढेवाडी, अनवली, फुलचिंचोली, पुळूज, सरकोली, उजनी वसाहत, तावशी, मगरवाडी आदी २३ गावांचा समावेश आहे.

आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यात पूर्वी आरक्षण काढलेल्या आणि आत्ताच्या आरक्षणामध्ये जवळपास २० गावांच्या आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये सरपंच पदासाठी आता नव्याने समीकरणे जुळविली जात आहेत. अनेक सदस्य पुन्हा बाहेरगावी जात असून, प्रत्यक्ष सरपंच, उपसरपंच निवडी २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. तोपर्यंत तालुक्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

निम्म्या गावांवर येणार महिलाराज

मागीलवेळी आरक्षण सोडतीत ४५ ठिकाणी महिला सरपंचांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र, आज नव्याने ९४ गावांच्या काढलेल्या आरक्षण सोडतीत जवळपास ५७ गावांतील महिलांसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. शिवाय अनेक गावांमध्ये पुरूषांच्या ठिकाणी महिला सरपंच काम पाहणार आहेत. त्यामुळे तालुक्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे.

महिला सरपंच आरक्षण सोडत निघालेली गावे

महिला सरपंच म्हणून काम पाहणाऱ्या गावांमध्ये अनुसूचित जमाती : रोपळे, शेगाव दुमाला, अनुसूचित जाती : पुळूजवाडी, शेंडगेवाडी, आव्हे - तरटगाव, उंबरगाव, भटुंबरे, नेपतगाव, शिरढोण, शेवते, कोंढारकी, तिसंगी, नामाप्र : आजोती, पांढरेवाडी, तनाळी, जैनवाडी, केसकरवाडी, खेडभोसे, चिंचोलीभोसे, गार्डी, शंकरगाव - नळी, नेमतवाडी, पिराची कुरोली, व्होळे, सर्वसाधारण : उंबरे, जळोली, पेहे, सुगाव भोसे, शेळवे, भंडीशेगाव, कौठाळी, वाखरी, गादेगाव, बाभुळगाव, देगाव, रांझणी, सिद्धेवाडी - तरटगाव, एकलासपूर, कासेगाव, खर्डी, शेटफळ, आंबे, विटे, ओझेवाडी, टाकळी - गुरसाळे, सुपली, तुंगत आदी ५७ गावांचा समावेश आहे.

Web Title: Women Sarpanch will look after 57 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.