महिलांनी आत्मनिर्भर व्हावे : बोबडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:46+5:302021-03-13T04:40:46+5:30
टेंभुर्णीत जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांची आरोग्य तपासणी, लाठी-काठी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. तेव्हा त्या बोलत होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ...
टेंभुर्णीत जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांची आरोग्य तपासणी, लाठी-काठी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. तेव्हा त्या बोलत होत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल माने यांनी आरोग्याविषयी, शीला सटाले यांनी विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या महिलांविषयी तर वैशाली मासाळ यांनी सौंदर्याविषयी मार्गदर्शन केले.
सर्व महिलांची हिमोग्लोबिन, मधुमेह, शुगरची मोफत तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष रत्नमाला शिंदे, पल्लवी गायकवाड, आशा निमसे, जयश्री तांबे, रोहिणी कोठावळे, स्वाती साखरे, विद्या देशमुख, सारिका शिखरे, मिताली शहा, अश्विनी ढवळे, धनश्री ढवळे, सोनाली हुंबे, माधुरी दास, सारिका खडके, विद्या देशमुख, अश्विनी देशमुख, सुवर्णा देशमुख यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.
यांचा झाला सन्मान
महिला बचत गटाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंगल खडके, ग्राम संघाच्या पूर्वा बोके, राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत चार सुवर्णपदक मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावलेली समीक्षा देशमुख, शरयू नरोटे, वंदना चौधरी, विमा क्षेत्रातील किरण मळेकर, उद्योजिका शोभा मोरे, लाठी-काठीचे प्रशिक्षक विलास कोठावळे, अक्षय पवार, रमेश तिपाले यांचा सन्मान करण्यात आला.
फोटो
११टेंभुर्णी-तपासणी
ओळी
टेंभुर्णी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात महिलांची तपासणी करताना डॉक्टर.