शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:33+5:302021-02-05T06:50:33+5:30

कुरुल : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात महिला कमी पडत आहेत. स्त्री सक्षम झाली पाहिजे. ती स्वत: आत्मनिर्भर झाली पाहिजे. ...

Women should come forward to avail the benefits of government schemes | शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे

Next

कुरुल : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात महिला कमी पडत आहेत. स्त्री सक्षम झाली पाहिजे. ती स्वत: आत्मनिर्भर झाली पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी महिलांनी आता स्वत:हून पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केले.

शेटफळ येथे डोंगरे यांनी लोकशक्ती परिवाराच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता. याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, पंचायत समिती सदस्या डॉ. प्रतिभा व्यवहारे, सुजाता डोंगरे, वृषाली डोंगरे, विद्या डोंगरे उपस्थित होत्या.

यावेळी निशिगंधा माळी म्हणाल्या, चूल व मूल या संकल्पनेतून महिलांनी आता बाहेर पडले पाहिजे. अर्थात चुलीला व मुलांना पहिले प्राधान्य द्याच, मात्र त्याही पुढे जाऊन स्वत:ला सिद्ध करून दाखवा. स्वत:च्या मनातील न्यूनगंड दूर करा. हिमतीने स्पर्धेत उतरा असे सांगितले.

यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा, उखाणे यामुळे कार्यक्रम रंजक झाला. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे वाटप करण्यात आली.

---

फोटो : ३१ चंचल पाटील

शेटफळ येथील महिला मेळाव्याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, डॉ. निशिगंधा माळी, सुजाता डोंगरे, डाॅ. प्रतिभा व्यवहारे, वृषाली डोंगरे आदी उपस्थित होत्याण

Web Title: Women should come forward to avail the benefits of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.