महिलांनो कुटुंबासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:20+5:302021-02-18T04:39:20+5:30
सांगोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने जवळा येथे आयोजित ‘वाण आरोग्याचा’कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ...
सांगोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने जवळा येथे आयोजित ‘वाण आरोग्याचा’कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, पंचायत समिती सदस्य सरिता साळुंखे, शोभाताई खटकाळे, राष्ट्रवादी युवती मंचच्या जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले, शुभांगी जाधव, नगरसेविका स्वाती मस्केसह मान्यवर उपस्थित होते.
महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. नेहा पाटील, डॉ. विनायक डमकले, डॉ. सचिन गवळी, डॉ. पीयूष साळुंखे पाटील, डॉ. मेघना देवकते, डॉ. वैशाली काशीद, डॉ. ज्योती साळे व डॉ. सुप्रिया गायकवाड यांनी जवळा परिसरातील २७० महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, १८० महिलांचे साखरेचे प्रमाण तपासणी, तर १७० महिलांची हाडांची ठिसूळता तपासून करून औषधोपचार केले. महिलांसाठी असे अभिनव उपक्रम सातत्यानेे राबविल्यास महिलांच्या आरोग्याची समस्या निर्माण होणार नाहीत आणि महिलांना सुदृढ व निरोगी आरोग्य लाभेल अशा भावना उपस्थित महिलांमधून व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या साधना राऊत सखुबाई वाघमारे, शुभांगी पाटील, अनुराधा गायकवाड, सूचिता मस्के, मंगल खाडे, जयश्री पाटील तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमरजीत गोडसे, तालुकाध्यक्ष विजय काशीद, शहराध्यक्ष डॉक्टर वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ
सांगोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने जवळा येथे आयोजित ‘वाण आरोग्याचा’ कार्यक्रमप्रसंगी जयमाला गायकवाड, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, यशराजे साळुंखे पाटील आदी.
----