महिलांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या: माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:18+5:302021-02-18T04:40:18+5:30

महिलांनी स्वतः सर्व योजनांची माहिती करून घ्यावी व स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तरच महिलांची ...

Women take advantage of government schemes: Mane | महिलांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या: माने

महिलांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या: माने

Next

महिलांनी स्वतः सर्व योजनांची माहिती करून घ्यावी व स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तरच महिलांची प्रगती होईल, असे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी जेऊर येथे आयोजित एकल महिला मेळाव्यात उद्‌घाटनप्रसंगी बोलताना केेले.

याप्रसंगी अविनाश थोरात, विस्तार अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी विविध घरकुल योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत महिलांना माहिती दिली. उमेद स्वयंसहायता समूह प्रकल्प प्रमुख पंढरीनाथ ठाणगे यांनी बचत गट निर्मिती व महिलांच्या विकासासाठी बचत गटांचा उपयोग यावर मार्गदर्शन केले. उमाकांत पडवळ यांनी स्वयंरोजगाराच्या विविध योजना व प्रशिक्षण याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचा उद्देशाची माहिती ॲड. सविता शिंदे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन वेगवेगळ्या शासकीय योजनांचे फॉर्म प्रत्यक्षरित्या महिलांकडून स्वीकारले. कार्यक्रमांमध्ये जेऊर व परिसरातील आठशे महिलांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी तर आभार माया कदम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पा कर्चे, वैशाली घोडके, अंजना साळुंखे, वंदना घोडके, मनिषा ठोंबरे, आशा चांदणे, मनीषा साळवे, गायत्री कुलकर्णी, शारदा सुतार तसेच ग्रामपंचायत जेऊरचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : १७जेऊर-मेळावा

जेऊर येथे आयोजित एकल महिला मेळव्यात बोलताना तहसिलदार समीर माने.

Web Title: Women take advantage of government schemes: Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.