लग्न समारंभासाठी दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरीची खरेदीकडे महिलांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:22 PM2021-12-18T12:22:15+5:302021-12-18T12:22:18+5:30

वजनानाने हलके, पारंपरिक, नक्षीदार यांना मागणी जास्त

Women tend to buy southern temple jewelery for weddings | लग्न समारंभासाठी दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरीची खरेदीकडे महिलांचा ओढा

लग्न समारंभासाठी दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरीची खरेदीकडे महिलांचा ओढा

Next

सोलापूर : आजच्या काळात प्रत्येकाला पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांसोबत च दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरी या दागिन्यांची क्रेझ वाढत आहे. ड्रेसनुसार दिसायला मोठे मात्र, वजनाने हलकी आणि पारंपरिक असलेल्या दागिन्यांची मागणी आहे. दिसायला मोठे आणि नक्षीदार दागिन्यांना अधिक मागणी असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

सराफा दालनांमध्ये महाराष्ट्रीयन, पेशवाई, मुघलकालीन, निजामकालीन आणि दाक्षिणात्य दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन आले आहेत. पूर्वीच्या मंदिरांतून किंवा राजे - महाराजांच्या काळातील वापरत असलेल्या मोठ्या आकाराच्या दागिन्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. या नव्या युगातील दागिन्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ असते मंगळसूत्र आणि पाटल्यांची. भारतीय ते पाश्चिमात्य पोशाखांसह सहजपणे वापरले जाऊ शकतात. या शिवाय मेंटेनन्ससाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तरुणाईस पसंतीस पडत आहेत.

पारंपरिक दागिने हवेच

नथ, ठुशी असे आपले पारंपरिक दागिने आता थोडा नवा साज घेऊन अँटिक बनून फॅशनच्या जगतात पुन्हा अवतरत आहेत. दंडाला वाकी, गळ्यात तन्मणी, लफ्फा किंवा ठुशी, पोहेहार, चपलाहार, हातात तोडे, पाटल्या, बांगड्या, गोठ, ब्रेसलेट या पारंपरिक दागिन्यांना आधुनिक रूप दिल्याने या दागिन्यांची सध्या बाजारात कलात्मकता आजही जिवंत आहे.

 

सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो )

जानेवारी २०१९ -३५२००-

  • जानेवारी २०२० -४२१६०-
  • जानेवारी २०२१- ५०२०२-६७३५३
  • फ्रब्रुवारी - ४८७४५-७३०४३
  • मार्च -४५१७६-६८४६६
  • एप्रिल -४४१९०-६२८६२
  • मे -४६१००-६८४७५
  • जून -४९०३२-७१३५०
  • जुलै -७५३४६-६७८३२
  • ऑगस्ट -४८०१७-६७७५२
  • सप्टेंबर -४७२३९-६३४०२
  • ऑक्टोबर -४५८५१-५८११८
  • नोव्हेंबर -४७८५१-६२०६९
  • डिसेंबर -४८८३४-६१०७१

 

टेम्पल ज्वेलरीची क्रेझ

राजे - महाराजांच्या काळातील, प्राचीन, दाक्षिणात्य आणि आधुनिकता यांचा आगळा संगम करून तयार करण्यात आलेली दागिन्यांची क्रेझ आहे. पारंपरिक टेम्पल ज्वेलरी अँटिक दिसण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर खास प्रक्रिया करून त्यावर लालसर रंग आणला जातो. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांपेक्षा टेम्पल ज्वेलरी वेगळी दिसते.

हलक्या वजनांच्या दागिन्यांना मागणी

सध्या दिसायला खूप मोठे, आकर्षक , जाड, पारंपरिक, ट्रेंडी असणाऱ्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सोन्याच्या आणि खड्यांच्या, कर्णफुले, मंगळसूत्र, अंगठ्यांना सर्वाधिक मागणी आहे.

विवाहाचे मुहूर्त

  • डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९
  • जानेवारी : २०, २२, २३, २७, २९
  • फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९
  • मार्च : २५, २६, २७, २८
  • एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५
  • मे : ४, १०,१३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७
  • जून : १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२
  • जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९

Web Title: Women tend to buy southern temple jewelery for weddings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.