Solapur: महिला विणकारांना मिळणार पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता, वस्त्रोद्योग मंत्र्यांचा निर्णय, आडम मास्तरांनी दिली माहिती
By बाळकृष्ण परब | Published: October 4, 2023 02:38 PM2023-10-04T14:38:04+5:302023-10-04T14:40:14+5:30
Solapur News: कल्याणकारी योजनेअंतर्गत महिला विणकारांना १५ हजार तसेच पुरुष विणकारांना दहा हजार रुपये उत्सव भत्ता देण्याचा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - कल्याणकारी योजनेअंतर्गत महिला विणकारांना १५ हजार तसेच पुरुष विणकारांना दहा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यात येणार आहे. तसेच विणकारांना २०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचाही निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
हातमाग विणकर कल्याणकारी योजनेतील तरतुदींनुसार हातमाग विणकर कारागीरांना सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. या प्रश्नी वस्त्रोद्योग मंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले. या विषयावर वस्त्रोद्योग मंत्र्यांनी बैठक घेतली असून जानेवारी २०२४ ला मकर संक्रांतीच्या उत्सव दरम्यान विणकारांना उत्सव भत्ता देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले, असे आडम मास्तर यांनी सांगितले.