सापानं डंख मारल्यानं वस्तीवर राहणाऱ्या माऊलीनं सोडला प्राण
By विलास जळकोटकर | Published: August 7, 2023 04:35 PM2023-08-07T16:35:05+5:302023-08-07T16:35:21+5:30
सापानं चावल्याच्या घटनेला दोन तास उलटून गेले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
सोलापूर : वस्तीवर राहण्यासाठी असलेली महिला काम करीत असताना तिला सापानं डंख मारला. दवाखान्यात नेताच उपचारापूर्वीच त्या माऊलीचं प्राण सोडला. अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरी येथे रविवारी रात्री ८:३० वाजता ही घटना घडली. सुरेखा मनतय्या हिरेमठ (वय- ४०) असे या महलेचे नाव आहे.
यातील हिरेमठ कुटुंबीय हे वागदरी येथे शेतातल्या वस्तीत राहण्यास आहे. शेतातली कामेही लवकर व्हावीत म्हणून मनतय्या हिरेमठ, पत्नी सुरेखा, मुलगा दिवसभर शेतात काम करुन गुजराण करतात. रविवारी रात्री सर्वजण शेतातल्या घरामध्ये होते. सुरेखा या काम करीत होत्या. अचानक त्यांना सापानं डंख मारला. काही होतेय यापूर्वीच त्या घाबरुन गेले. वाहनाची जमवाजमव करुन त्यांना रात्री १०:३० पर्यंत सोलापूरला शासकीय रुग्णालयात मुलानं दाखल केले. सापानं चावल्याच्या घटनेला दोन तास उलटून गेले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद आहे.