Women's Day Special : पोट भरण्यासाठी वृद्ध अनंताम्माला रणरणत्या उन्हात वेचावा लागतोय कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:39 AM2019-03-08T11:39:29+5:302019-03-08T11:41:10+5:30
काशिनाथ वाघमारे सोलापूर : ६५ वर्षीय वृद्धा़़़ रणरणत्या उन्हात चटके घेत कचरा वेचते़़़ झाडाची थोडीशी सावली मिळाली की घोटभर ...
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : ६५ वर्षीय वृद्धा़़़ रणरणत्या उन्हात चटके घेत कचरा वेचते़़़ झाडाची थोडीशी सावली मिळाली की घोटभर पाणी घेते़. दिवसभरातले पाच तास फि रून कचरा वेचून दिवसाची गुजराण करणाºया वृद्धेची आशा अजून संपलेली नाही. विधवा मुलीला घेऊन दोघींच्या संसाराचा गाडा हाकते आहे. पतीच्या निधनानंतरही उदरनिर्वाहासाठीचा संघर्ष चालूच आहे़़़ लग्नापूर्वी होता आणि आता पतीच्या निधनानंतरही संघर्ष थांबला नाही. या संघर्षालाच कवटाळून जगणाºया आम्माला जागतिक महिला दिनाची संकल्पनाच कळालेली नाही़ रोजचा दिवस सारखाच वाटतो.
अनंताम्मा अशोक कवडे असे संघर्षवान आम्माचे नाव़ लष्कर परिसरातील सरस्वती चौकात राहणारी अनंताम्मा कधी सकाळी तर कधी दुपारी उठून उकिरड्यावरील प्लास्टिक कचरा वेचून दिवसाची गुजराण करते आहे़ सरकारने अनेक योजना काढल्या, परंतु त्या खºया अर्थाने अशा आम्मापर्यंत कुठे पोहोचल्या? हा प्रश्न निरुत्तर करतो़ ना शिक्षण घेता आले, ना नातेवाईक राहिले़ पती आणि जावयाच्या निधनानंतर एकाकी पडलेली आम्मा एकुलत्या एका मुलीला आपले विश्व मानून जगते आहे.
दिवसभरात अशोक चौक, अक्कलकोट रोड अशा अनेक परिसरात फिरून कचरा वेचणाºया आम्माला दिवसभरात पाच तास फिरून केवळ ५० रुपये मिळतात़ मिळालेल्या पैशात गुजराण करताना खूप समस्या समोर येतात़ या समस्या घेऊन दिवस काढते़ काही वर्षांपूर्वी मुलीचा विवाह लावून दिला़ तिचा पतीही खूप दिवस राहिला नाही़ या वयात कोणाचाच आधार नसल्याने एकाकी जगणाºया आम्मापर्यंत शासनाची कोणतीच योजना पोहोचली नाही, याचीच खंत ती व्यक्त करते़
जखमा घेऊन जगते़...
उतारवयातही कष्टाचे ओझे पेलून जगणारी आम्मा म्हणते, कचरा वेचता वेचता अनेक रोगही जडतात. कधी-कधी काचा, खिळे हाता-पायांना लागून जखमा होतात. पतीच्या निधनानंतरही मनावर काही जखमा राहिल्या़ कधी शरीरावरच्या तर कधी मनावरच्या जखमा बºया करत आम्मा जगते आहे़ समाजातून मदतीचा आधार मिळावा, कुणीतरी श्रावणबाळ होऊन पुढे यावे, एवढीच अपेक्षा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त करते आहे़