डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा
By संदीप शिंदे | Published: February 22, 2024 05:47 PM2024-02-22T17:47:56+5:302024-02-22T17:48:20+5:30
पाण्याची सोय करावी, नागरी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी गुरुवारी महिलांनी डिगोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
डिगोळ (जि.लातूर): परिसरातील सोनारवाडी वस्ती ही डिगोळ ग्रामपंचायतला संलग्न असून, वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याची सोय करावी, नागरी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी गुरुवारी महिलांनी डिगोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन सरपंच, उपसरपंच यांना देण्यात आले.
सोनारवाडी येथील वस्तीमध्ये हातपंप व बोअरवेल नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करून द्यावे, वस्तीत पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याची गंभीर समस्या आहे त्यामुळे ही समस्या सोडवावी, वस्तीला मुबलक पाणी सोडावे, जलजीवनची पाईपलाईन टाकून प्रत्येक घराला नळ कनेक्शन द्यावे, ग्रामपंचायतीच्या सुविधा पुरविण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन सरपंच कविता दासरे, उपसरपंच बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले. दरम्यान, लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात जनाबाई वाडकर, रामदास वाडकर, बालाजी वाडकर, महादेव वाडकर, रंजना वाडकर, संगिता वाडकर, प्रियंका वाडकर, सुकूमार वाडकर, आशा वाडकर, चंद्रकलाबाई वाडकर, सारजाबाई वाडकर, रामदास वाडकर, हरीभाऊ वाडकर, भगवंत वाडकर, चंद्रकांत वाडकर, शिवशंकर वाडकर, मोहन वाडकर, ओमकार वाडकर, प्रमोद वाडकर, रामदास वाडकर, रंजनाबाई वाडकर, रुक्मिणीबाई वाडकर, वनमाला वाडकर, शिवशंकर वाडकर, मिरा वाडकर आदींचा सहभाग होता.