२१ पैकी २० जागांवर विजय; विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 12:24 PM2022-07-07T12:24:02+5:302022-07-07T12:24:07+5:30

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये  भगीरथ व काळे गटाचे १८ वर्षाची सत्ता उलधवून टाकत  अभिजीत ...

Won 20 out of 21 seats; Abhijit Patel's dominance over Vitthal sugar factories | २१ पैकी २० जागांवर विजय; विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे वर्चस्व

२१ पैकी २० जागांवर विजय; विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे वर्चस्व

Next

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये  भगीरथ व काळे गटाचे १८ वर्षाची सत्ता उलधवून टाकत  अभिजीत पाटील यांनी २१ पैकी २० जागा जिकंत निविर्वाद  वर्चस्व प्रस्तापित केले आहे. या निवडणुकीत वारसा सांगणाऱ्या युवराज पाटील व भगीरथ भालके या दोघांचाही धक्कादायक पराभव झाला आहे. अभिजीत पाटील यांच्या रुपाने एका युवा नेतृत्वाचा उदय झाला असून येणाऱ्या सर्व निवडणुका पुर्ण ताकतीने लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

या निवडणुकीत एकूण २३००२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अभिजीत पाटील पॅनेलचे सर्वच उमेदवार एकाच दुसरा गट वगळता १ नंबरवर राहीले. तुंगत, मेंढापूर गटात युवराज पाटील यांची आघाडी होती. तर सरकोली, कासेगाव गटात भगीरथ भालके दोन नंबरवर राहीले. यामध्ये तब्बल ४५२२ मते अवैध मते ठरली याचा फटका नक्की कोणाला बसणार याची मथंन करण्यात पराभूत पॅनेल गुंतला होता. तर विजयानंतर अभिजीत पाटील यांनी पंढरपुर शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. 

  • विजयी झालेले उमेदवार...
  • - भाळवणी गट - धनंजय उत्तम काळे (८३२७ मते, वाडीकुरोली), साहेबराव श्रीरंग नागणे (८३१५ मते, रा. उपरी), कालिदास रघुनाथ पाटील (८१६५ मते,  रा. कौठाळी),
  • - करकंब गट - नवनाथ अंकुश नाईकनवरे ( ८५०० मते, रा. पटवर्धन कुरोली), दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे (७९३० मते, रा. जळोली), कालिदास शंकर साळुंखे ( ७८७७ मते, रा. खेडभोसे),
  • - मेंढापूर गट - जनक माणिक भोसले (८३०१ मते, रा. रोपळे बुद्रुक), दिनकर आदिनाथ चव्हाण (८०४० मते, रा. आढीव),
  • - तुंगत गट - अभिजीत धनंजय पाटील (८७४६ मते, रा. देगाव), प्रविण विक्रम कोळेकर (६८९३ मते, रा. गुरसाळे),
  • - सरकोली गट - संभाजी ज्ञानोबा भोसले (८४४१ मते, रा. सरकोली), सचिन सोपान वाघाटे (७८७५ मते, रा. आंबे),
  • - कासेगाव गट - सुरेश बाबा भुसे (८५२८ मते, रा. कासेगाव), बाळासाहेब चिंतामणी हाके (८२५५ मते, रा. कोर्टी), प्रेमलता बब्रुवाहन रोंगे (८१६२ मते, रा. कराड रोड गेंड वस्ती, पंढरपूर),
  • - अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघ - सिताराम तायाप्पा गवळी (८६४३ मते, रा. कासेगाव),
  •  
  • - इतर मागासवर्ग मतदारसंघ - अशोक ज्ञानोबा जाधव (८६५४ मते, रा. फुलचिंचोली)
  • - महिला प्रतिनीधी मतरास संघ - कलावती महादेव खटके (८४३२ मते, रा. भोसे), सविता विठ्ठल रणदिवे (८१४६ मते, रा. तुंगत),
  • - विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्ग मतदारसंघ - सिध्देश्वर शंकर बंडगर (८६८४ मते, रा. होळे)
  • - उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था - समाधान वसंतराव काळे (६४ मते, रा. वाडीकुरोली)

Web Title: Won 20 out of 21 seats; Abhijit Patel's dominance over Vitthal sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.