ऊन वाढलं; शीतपेयांकडे ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:14+5:302021-03-16T04:23:14+5:30
----- उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहने खिळखिळे सोलापूर : जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते उखडले आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने खिळखिळे ...
-----
उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहने खिळखिळे
सोलापूर : जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते उखडले आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने खिळखिळे होत असल्याने वाहन दुरुस्तीसाठी वारंवार गॅरेजकडे जावे लागत असल्याचे गाऱ्हाणे लोकांमधून होत आहे. संबंधित विभागाने नादुरुस्ती तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
----
कोरोनापासून बचावासाठी जनजागरण
दक्षिण सोलापूर : दुसऱ्या टप्य्यात कोरोना डोके वर काढू लागला आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरण सुरू आहे. प्रशासनाकडूनही जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच जोडीला स्वयंसेवी संस्थांकडूनही कोरोनापासून बचावासाठी विविध माध्यमातून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
----
दंडाच्या भीतीने मास्कचा वापर
वडाळा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आठवडी बाजार, भाजी मंडई अशा ठिकाणीही विनामास्क वावरणाऱ्यांवर नगरपालिका, नगर परिषद, पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे भीतीपोटी का होईना लोकांमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
------