अहमदनगर-जातेगाव महामार्गाचे काम मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:21+5:302021-07-26T04:22:21+5:30
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, या रस्त्याबाबत सर्व्हेचे काम ...
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, या रस्त्याबाबत सर्व्हेचे काम २०१९ ला झाले. संयुक्त मोजणी व सीमांकनाचे काम पूर्ण झाले, नकाशे झाले पण भूसंपादनाचे काम थांबलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे. ते मिळाले नाही, म्हणून पुढील काम थांबले आहे.
अहमदनगरपासून जातेगावपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले पण जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याचे अद्याप कोणतेच काम सुरू नाही. या रस्त्याची दुरवस्था झालेली असून येथे वारंवार अपघात होत असून अनेकांचे जीव जात आहेत. मंजूर रस्ता केवळ तांत्रिक बाबीमुळे रेंगाळला असून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बागल यांनी केली आहे. या निवेदनावर अनिल महाजन, वैभव सावंत, अप्पासाहेब सुरवसे आदींच्या सह्या आहेत.
----