२५ वर्षांपासून बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:01+5:302021-04-26T04:20:01+5:30
१९९६ साली युती सरकारच्या काळात तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांनी ही योजना मंजूर करून घेतली. त्यानंतर योजनेची कामे सुरू ...
१९९६ साली युती सरकारच्या काळात तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांनी ही योजना मंजूर करून घेतली. त्यानंतर योजनेची कामे सुरू झाले. काही काम ही झाले. मात्र प्रत्यक्षात पाणी आले नव्हते. २०१४ साली आमदार सोपल मंत्री असताना या योजनेची चाचणी घेऊन तालुक्याच्या शिवारात पाणी आणले. मधल्या काळात योजनेला निधी मिळावा यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनीदेखील शासन दरबारी प्रयत्न केले. सध्यादेखील सुरू आहेत. दोन्ही नेते पाणी सोडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
बार्शीतील २२, माढ्यातील ५ गावांसाठी ही योजना
सीना-माढा जोडकालव्यात उजणीतून सोडण्यात आलेले पाणी रिधोरे येथील बंधाऱ्यात सोडून ते मोटारीद्वारे उपसा करून पाइपलाइनद्वारे उपळाई शिवारात आणले जाते. त्याठिकाणी डावा कॅनाल आणि उजवा कॅनालद्वारे बार्शी तालुक्यातील २२ आणि माढा तालुक्यातील पाच गावांना ते कॅनॉलद्वारे शेतीसाठी देणे अशी ही योजना आहे. यातील पहिल्या टप्प्यातील रिधाेरे व लक्ष्याचीवाडी येथील पंपहाउसचे काम पूर्ण झाले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून हे पाणी तालुक्यातील उपळाई, खांडवी, शेंद्री, नागोबाचीवाडी, बार्शी ग्रामीण या गावांना त्याचा फायदा होत आहे. आता हे पाणी बार्शीच्या जवळ आले आहे. अद्याप ही या योजनेचे ६० टक्के काम बाकी आहे.