अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:07+5:302021-02-05T06:49:07+5:30
रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य, खड्डे यामुळे जनता हैराण झाली होती. दररोज खड्ड्यामध्ये उसाचे ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते. ...
रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य, खड्डे यामुळे जनता हैराण झाली होती. दररोज खड्ड्यामध्ये उसाचे ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते. धुळीमुळे वाहनधारकांना वाहन चालवणे मुश्कील झाले होते. तसेच शेतातील पिकांवर धूळ बसत असल्याने पिकांची वाढ होत नव्हती. तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले होते.
त्यामुळे शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेने आक्रमक होत दररोज तीन वेळा रस्त्यावर पाणी मारण्यास भाग पाडले. तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख आशा टोनपे, युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी, प्रहारचे विठ्ठल मस्के, कुबेर मस्के, सुनील पराडे, रामचंद्र इंगळे यांनी स्वतः शेवरे-तळेकरपाटी-मस्केवस्ती येथील रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले.
यासाठी शिवसेना महिला आघाडी माढा तालुका प्रमुख प्रियंका शिंदे, वैशाली काळोखे, रेखा सुरवसे, सागर इंगळे, कल्याण इंगळे, नरा इंगळे, प्रशांत पराडे, लाव्हा पराडे, सिंधू गायकवाड, गोट्या इंगळे, दयानंद इंगळे, अर्जुन लावंड, आप्पा महाडिक, अप्पा पराडे, अमर गायकवाड, संतोष कामटे, ऋषिकेश मस्के यांनी परिश्रम घेतले.