ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:41+5:302021-05-08T04:22:41+5:30

सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेवर ...

The work of Kovid Center in the rural hospital is incomplete | ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचे काम अपूर्णच

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचे काम अपूर्णच

Next

सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेवर कोणाचाच वचक नसल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी सुस्त झाले आहेत. पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सांगोला ग्रामीण रुग्णालयासह मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचे ठरले होते. यासाठी आ. शहाजीबापू पाटील यांनी सुमारे १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे नियोजन करून कोविड सेंटर उभारणीचे काम सुरू केले असले तरी ते संथगतीने सुरू आहे. दोन आठवड्यांनंतरही केवळ रंगरंगोटीचेच काम सुरू असल्याचे दिसून येते.

कोट :::::::::::::

ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी ऑक्सिजन लाइनचा प्रस्ताव पाठवला आहे. ड्रेनेज दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.

-डॉ. उत्तम फुले,

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, सांगोला

Web Title: The work of Kovid Center in the rural hospital is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.