साडेनऊ हजार कामगारांच्या हाताला काम; जिल्ह्यातील ६२५ कारखाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:29 PM2020-06-09T17:29:36+5:302020-06-09T17:31:38+5:30

१ हजार ३४ कारखान्यांना दिली मंजूरी; अपलॉकच्या टप्प्यात कारखानदारांना दिलासा

The work of nine and a half thousand workers; 625 factories started in the district | साडेनऊ हजार कामगारांच्या हाताला काम; जिल्ह्यातील ६२५ कारखाने सुरु

साडेनऊ हजार कामगारांच्या हाताला काम; जिल्ह्यातील ६२५ कारखाने सुरु

Next
ठळक मुद्देदरम्यान, सुरु झालेल्या ६२५ प्रकल्पांत ९ हजार ४७६ कामगार आहेतऔद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहेजिल्ह्यातील १ हजार ३४ कारखाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी

सोलापूर :  जिल्ह्यातील ६२५ कारखाने पूर्ववत सुरु झाल्यामुळे ९ हजार ४७६ कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.  जिल्ह्यातील १ हजार ३४ कारखाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे, त्यापैकी ६२५ कारखाने सुरू झाले आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक बी. टी.  यशवंते यांनी दिली.

दरम्यान, सुरु झालेल्या ६२५ प्रकल्पांत ९ हजार ४७६ कामगार आहेत. सुरू झालेल्या कारखान्यात जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझर , रासायनिक खते, बि-बियाणे उत्पादन, औषध निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ, खनिजावर आधारित उद्योग, इंजिअनिरिंग उद्योग आदी कारखान्यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे. कारखाने सुरू करताना कामगारांनी फिजीकल डिस्टन्स ठेवावे, मास्कचा वापर करावा, हात धुवावे अशा सूचनांची पालन करणे आवश्यक आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कारखाने सुरु करण्याच्या प्रक्रियेविषयी आधिक माहितीसाठी उद्योजकता विभागाचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The work of nine and a half thousand workers; 625 factories started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.