तलावातून खाणीत जाणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:31+5:302020-12-05T04:48:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील गाळ हा शेजारी असणाऱ्या खाणींमध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी पाईपलाईन टाकण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील गाळ हा शेजारी असणाऱ्या खाणींमध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाले.
संभाजी तलावातील गाळ काढण्याच्या प्रकल्पास मागील काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. या तलावातील गाळ हा शेजारी असणाऱ्या खाणींमध्ये टाकून गाळासोबत आलेले पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. यासाठी एक हजार मीटरपर्यंतच्या पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले होते. सध्या ७०० मीटरची पाईपलाईन ही खाणीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काम सुरू असताना गरज पडल्यास आणखी ३०० मीटर पाईपलाईन वाढवता येऊ शकते.
सध्या पाईपलाईनचे काम हे पूर्ण झाले असून, आता आयआयटी चेन्नईने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तलावात किती गाळ आहे ते या अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर येथील एका कंपनीमार्फत आयआयटी चेन्नईने सादर केलेल्या अहवालाची फेरतपासणी होईल. यानंतरच गाळ काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. साधारणपणे बुधवार किंवा गुरुवारी गाळ काढण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
--------------
दोन लाख ७० हजार क्यूबिक मीटर गाळ
२०११ ते २०१२ दरम्यान एका खासगी कंपनीद्वारे तलावातील गाळाचे सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार तलावामध्ये दोन लाख ७० हजार क्यूबिक मीटर इतका गाळ आहे. मागील आठवड्यात आयआयटी चेन्नईच्या पथकाने सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तलावात किती गाळ आहे ते स्पष्ट होणार आहे.
--------
फोटो : माजी सैनिक नगरच्या पाठीमागे असलेल्या खाणीत संभाजी तलावातून आलेल्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले
******