जनतेच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:16 AM2021-07-15T04:16:57+5:302021-07-15T04:16:57+5:30

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सांगोल्यात शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ...

Work to solve the problems of the people | जनतेच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी कामाला लागा

जनतेच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी कामाला लागा

Next

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सांगोल्यात शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, उदय घोंगडे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, नगरसेवक सोमेश यावलकर, युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, तालुकाप्रमुख सुभाष भोसले, महूद शहरप्रमुख अस्लम मुलाणी, समीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे, महिला उपजिल्हा प्रमुख सुरेखा सलगर, सागर चव्हाण, गोरख येजगर, गणेश कांबळे, नामदेव आलदर, आदी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांच्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघात सुमारे १७५ कोटींची विकासकामे केली आहेत. सांगोला तालुक्यासह विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करण्याचा मानस आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीअगोदर केलेल्या विकासकामांची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळ :::::::::::::::::::

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियानाच्या प्रारंभप्रसंगी आ. शहाजीबापू पाटील, भाऊसाहेब रुपनर, संभाजी शिंदे, सूर्यकांत घाडगे, आदी उपस्थित होते.

Web Title: Work to solve the problems of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.