आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:35+5:302021-06-10T04:16:35+5:30

समूह संघटक जाधव यांच्याकडून आशा सेविकांचा मोबदला कपात करणे, राज्य शासनाकडून प्राप्त वाढीव मोबदल्यात कपात करणे, गटप्रवर्तकांच्या मानधनात कपात ...

Work stoppage agitation of Asha workers and group promoters | आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन

आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन

googlenewsNext

समूह संघटक जाधव यांच्याकडून आशा सेविकांचा मोबदला कपात करणे, राज्य शासनाकडून प्राप्त वाढीव मोबदल्यात कपात करणे, गटप्रवर्तकांच्या मानधनात कपात करण्याची धमकी देणे, गटप्रवर्तकांना सकाळी बोलावून संध्याकाळपर्यंत विनाकारण ऑफिसबाहेर बसवून ठेवणे, कार्यक्षेत्रात भेटी न देता फोनवरून रिपोर्टिंग घेणे, पंचायत समिती, सार्वजनिक ठिकाणी गटप्रवर्तकांना अपमानित करणे, शासनाकडून येणारी माहिती, परिपत्रक, स्टेशनरी न देणे अशा स्वरूपाची अडवणूक तालुका समूह संघटनांकडून होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी केला आहे. जोपर्यंत तालुका समूह संघटकांची बदली होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

यावेळी युनियनच्या सचिव पुष्पा पाटील, गटप्रवर्तक ज्योती घोडके, महानंदा कुंभार, सुजाता माशाळ, वृषाली थिटे, स्वप्नाली म्हमाणे, शीतल सावंत, ज्योती शिंदे, स्वाती वाघमारे, रोहिणी हराळे, भारती तांदळे आदींसह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

---

याबाबतची तक्रार आमच्याकडे आली असून, यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

- गणेश मोरे, गटविकास अधिकारी

----

फोटो : ०९ मोहोळ

पंचायत समिती कार्यालयासमोर आशा वर्कर व गटप्रवर्तक काम बंद करून ठिय्या आंदोलन करताना

Web Title: Work stoppage agitation of Asha workers and group promoters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.