चंद्रभागेतील वाळूचोरी रोखण्यास खड्डे बुजवण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:47+5:302020-12-09T04:17:47+5:30
पंढरपूर : चंद्रभागा वाळवंटातून अवैद्य वाळू उपसा रोखण्यासह आता पोलीस प्रशासनाने नगर परिषदेच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे कामही हाती घेतले ...
पंढरपूर : चंद्रभागा वाळवंटातून अवैद्य वाळू उपसा रोखण्यासह आता पोलीस प्रशासनाने नगर परिषदेच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे कामही हाती घेतले आहे.
पंढरपूर तालुक्याला भीमा नदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लाभले आहे. यामुळे छोट्या छोट्या गावातूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. त्याचबरोबर शहरातील सांगोला, पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या ठिकाणावरून अहिल्यादेवी पूल, नवीन पूल, दगडी पूल यांच्यासह पुंडलिक मंदिर, स्मशानभूमी आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो.
वास्तविक पाहता अवैधरीत्या होणारा वाळू उपसा रोखण्याचे काम महसूल विभागाकडून होणे गरजेचे आहे. मात्र महसूल विभागाकडून वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर करावाई होत नसल्याने काही संघटनांनी चंद्रभागा नदीपात्रातील खड्डे बुजवा. वाळवंटातील मंदिरांच्या बाजूचीदेखील वाळू चोरीमुळे मंदिरेही धोक्यात आहेत. त्याचबरोबर नदीच्या पात्रात खड्डे पडल्याने भाविकांचे जीव धोक्यात पडत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाने पंढरपूर नगर परिषदेकडील जेसीबीच्या माध्यमातून चंद्रभागा नदीपात्रातील व वाळवंटातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
कोट ::::
अवैधरीत्या वाळू चोरी करणाऱ्यांवर सतत कारवाई सुरू आहे. मागील चार दिवसात वाळूचोरीबाबत तीन गुन्हे दाखल केले आहेत. चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील मंदिराच्या बाजूला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
- अरुण पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर
फोटो लाईन :
चंद्रभागा नदीपात्रातील खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्यात येत आहेत.
फोटो : चंद्रभागा नदीपात्रातील खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्यात येत आहेत. (फोटो : सचिन कांबळे)