लोखंडी कैंचीवरुन पडून कामगार बेशुद्ध; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच गेला जीव
By विलास जळकोटकर | Published: May 8, 2023 06:03 PM2023-05-08T18:03:06+5:302023-05-08T18:03:56+5:30
कुमठे गावातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा राजू लालसरे हा कामगार बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये रविवारी फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी गेला होता.
सोलापूर : ऑईल मिलमध्ये लोखंडी कैंचीवरुन फॅब्रिकेशनचं काम करताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने कामगार बेशुद्ध पडला. रविवारी सायंकाळी ५:५० च्या सुमारास बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये ही घटना घडली. त्याला रुग्णालयात दाखल केला मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजू शंकर लालसरे (वय- ४७, रा. कुमठे, सिद्धार्थ नगर, सोलापूर) असे मयत कामगाराचे नाव आहे.
कुमठे गावातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा राजू लालसरे हा कामगार बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये रविवारी फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी गेला होता. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तो लोखंडी कैचीवर उभारुन काम करीत होता. अचानक त्याला तोल गेला आणि जमिनीवर आपटला. यामध्ये त्याची शुद्ध हरपली. बेशुद्धावस्थेत त्याचा मित्र लखन गजधाने यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.