विषमुक्त आंबा या विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:30+5:302021-07-14T04:25:30+5:30
--- मार्कंडेय रथोत्सव मार्गावरील विद्युत पुरवठा भूमिगत करा सोलापूर : येथील पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा ...
---
मार्कंडेय रथोत्सव मार्गावरील विद्युत पुरवठा भूमिगत करा
सोलापूर : येथील पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या रथोत्सव मिरवणुकीला जवळपास १०० वर्षांची परंपरा आहे. आपत्कालीन धोका टाळण्यासाठी रथोत्सव मिरवणूक मार्गावरील विद्युत पुरवठा भूमिगत करण्यात यावा, अशी मागणी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे करण्यात आली. यावेळी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, प्रा. अनुप अल्ले आदी उपस्थित होते.
----
कुर्डूवाडीमध्ये ओपन जिमचे उद्घाटन
कुर्डूवाडी : शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत येथील नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक एकच्या पटांगणात ओपन जिमचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका राधिका धायगुडे, नंदा वाघमारे, दमयंती सोनवर, लिना सुराणा, वर्षा मोरे, मंगल पवार, विरोधी पक्षनेते संजय गोरे, नगरसेवक अरुण काकडे, निवृत्ती गोरे, अभियंता महादेव फासेपाटील, मनोज धायगुडे, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष, नगरसेवक आयुब मुलाणी, आनंद टोणपे, शकील तांबोळी, विशाल गोरे, दिलीप सोनवर, सागर चौधरी, करणसिंह परबत, कुमार गव्हाणे, स्वप्नील गवळी, सोमनाथ गवळी, महेंद्र मेहता, मुत्रा म्हमाणे, सज्जन लोंडे आदी उपस्थित होते.
---
भोसे येथे वृक्षारोपण
करमाळा : कृषीकन्या आरती बाळासाहेब सुरवसे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कॉलेजची कृषीकन्या मयुरी जयंत वारे यांनी करमाळा तालुक्यातील भोसे येथे वृक्षारोपण केले. यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष भोजराज सुरवसे, बाजार समितीचे संचालक वालचंद रोडगे, ग्रामपंचायत सदस्य भारत सुरवसे, मुख्याध्यापक सुनील जाधव, अंगणवाडी सेविका सुनीता वारे, ज्येष्ठ नागरिक बबन सुरवसे, ग्रामसेवक राम बडे, वनमाला सुरवसे, कुंडलिक सुरवसे, जयंत वारे, बाळासाहेब सुरवसे, निर्मला रोडगे, लता शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आरती सुरवसे हिला प्राचार्य डॉ. के. एच. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी ए. ए. शिंदे, कार्यक्रम समन्वयक एस. एस. बंडगर तर मयुरी वारे हिला प्राचार्य डॉ. मिलिंद आहिरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास भालेराव, कार्यक्रम समन्वयक प्रा. सतीश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
---
कामोणे येथील रस्ता दुरुस्तीची मागणी
करमाळा : कामोणे (दाम) येथील देमुंडे वस्ती ते कामोणे गावापर्यंत जोडला जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण झाले आहे. गावातील पांडुरंगाच्या मंदिरापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्त्यावर खूप मोठे खड्डे असून पाणी साचले आहे. लहान मुले व वयस्कर माणसांना यावरून चालता सुद्धा येत नाही. हे पाणी जास्त दिवस राहिले तर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. बांधकाम विभागाने व ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घेऊन संबंधितांनी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी येथील राम नलावडे, गिरीश नलवडे, रोहित नलावडे यांनी केली आहे.
---
चिखलठाण ग्रामपंचायतीस ईसीजी मशीन भेट
करमाळा : चिखलठाण ग्रामपंचायतीस डॉ. प्रशांत सुराणा यांच्याकडून ईसीजी मशीन भेट देण्यात आली आहे. शाळेसाठीची इमारत, संरक्षण भिंत तसेच आरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच इतर सामाजिक कार्यात या परिवाराचे भरीव योगदान राहिले आहे. चिखलठाण ग्रामस्थांसाठी ईसीजी मशीन भेट दिली. उपसभापती दत्ता सरडे, सरपंच चंद्रकांत सरडे, माजी उपाध्यक्ष जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथचे माजी व्हा. चेअरमन के. गव्हाणे, माजी उपसरपंच दिनकर सरडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सरडे, नवनाथ सरडे, शिवलाल सुराणा, पोपटलाल सुराणा, डॉ. बारकुंड, डॉ. पवार, अक्षय सरडे, आशावर्कर पोळ, ग्रामसेवक घाडगे, भाऊसाहेब सरडे आदी उपस्थित होते.
---
राज्य नाट्य स्पर्धा घेण्याची मागणी
सोलापूर : कोरोनाचे सर्व नियम पाळून नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करा. त्यामुळे कलावंतांना, पडद्यामागच्या तंत्रज्ञांना संधी मिळेल, अशी मागणी उपनगरीय नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके यांनी केली आहे. वर्षापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम स्पर्धा झाली; परंतु त्याचे पारितोषिक वितरणही झाले नाही. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरू झाल्याने सर्व ठप्प झाले. आता सर्व व्यवहार सुरळीत होत असताना नाट्य स्पर्धा घेण्यात याव्यात. कलावंतांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, अशा मागणीचे निवेदन राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांना देण्यात आले.
----
सावकारावर कायदेशीर कारवाईची मागणी
अक्कलकोट : तालुक्यातील बहुतेक शेतकरी वर्ग गरीब असल्याने कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. खासगी सावकार अवाच्या सव्वा व्याज लावून बरेच तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करतात, या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची जमीन हडप केलेल्या सावकारावर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अक्कलकोट तालुका उपप्रमुख आनंद बुकानुरे यांनी केली आहे.
---
गाडेगावात प्रवाशांसाठी निवारा करण्याची मागणी
बार्शी: एसटी बसच्या प्रतीक्षेत तासनतास रस्त्याच्यालगत थांबाव्या लागणाऱ्या गाडेगावकरांचे उन्हाळा, पावसाळ्यात हाल होतात. त्यामुळे गाडेगाव स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. बार्शी शहरापासून सुमारे सात कि.मी. अंतरावर असलेल्या गाडेगावकरांना बहुतांश व्यवहारासाठी दररोज बार्शीस यावे लागते. बार्शी-भूम, माणकेश्वर, जामखेड, जवळा अशा अनेक बस गाडेगाववरून दररोज दिवसभर ये-जा करतात; मात्र रस्त्यालगत वसलेल्या या गावाला अजूनही बस थांब्यावर निवारा मिळालेला नाही. बसायला बाकडे सुध्दा नसल्याने लोकांना रस्त्यालगत मातीतच बस्तान मांडावे लागते. आमदार किंवा खासदार निधीतून बस थांब्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
---
ओबीसी आरक्षणासंदर्भात बुधवारी रास्ता रोको
करमाळा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी. याबाबत ओबीसीच्या वतीने बुधवार, १४ जुलै २०२१ रोजी बायपास रोड, एमआयडीसी पाणी टाकीजवळ, करमाळा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीस समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, करमाळा अध्यक्ष दिलीप भुजबळ, पं. स. सदस्य रोहिदास सातव, दिनेश दळवी, चंद्रकांत मोहोळकर, होसिंग मोहोळकर, संदिप खारे, तेजस बनसोडे, संतोष शिंदे, हरिदास गदादे, राजेंद्र मोहोळकर, युवराज जाधव आदी उपस्थित होते.
---
सांगोला- कराड मार्गे एसटी बस सुरू
सांगोला : आगारातून सकाळी साडेसहा वाजता सांगोला-कराड बससेवा सुरू केली असल्याचे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले. प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार नरखडे, ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे, उपाध्यक्ष अरविंद येलपले, सचिव वामनराव देशमुख, प्रवासी संघटनेचे शशिकांत हरिदास, नागेश जोशी, रविराज शेटे आदींनी यासंदर्भात मागणी केली होती, असे वाहतूक नियंत्रक राहुल देशमुख यांनी सांगितले. कराडमधून अकरा वाजता ही बस कराड-सांगोला मंगळवेढा मार्गे सोलापूर अशी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कुमार नरखडे यांनी केले आहे.
---