World dog day; सोलापूरच्या तापमानाला होतात लॅब्राडोरसह कारवान अन् गावठी सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:50 PM2019-04-24T12:50:57+5:302019-04-24T12:58:32+5:30
जागतिक श्वान दिन; देशी जातीच्या कुत्र्यांमध्ये चपळता अन् प्रतिकारशक्तीही जास्त
जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : श्वान हा तसा इमानदार प्राणी. मालकाचे स्वामित्व जपत सुरक्षा करणारा रक्षकच. घर असो वा शेत त्याचा चांगला रखवालदार. तो आजच्या युगात परिवारातील आदर्श सहकारीही झालाय. सोलापूरच्या टेम्परेचरमध्ये गावठी कारवान, पश्मी अन् लॅब्राडोर जातच सूट होऊ शकते. कारण त्यांच्यात प्रतिकारशक्ती अधिक असते.
सध्या सुरक्षेबरोबरच प्रतिष्ठा म्हणून श्वान पाळण्याचे एक नवे फॅड निर्माण झाले आहे. यात विदेशातील अनेकानेक जातींचे श्वान पाळण्याकडे कल वाढतोय. त्यांच्या संगोपनाचा खर्च जास्त असला तरी त्याच जातीच्या श्वानांचे अधिकाधिक आकर्षण आहे. कारण आपल्या गावठी जातीच्या श्वानांपेक्षा दिसायला ती जात वेगळी व आकर्षक आहे. शिवाय मायाळू, मुलांसोबत बिनधास्त दंगामस्ती करणे, याबरोबरच तो परिवारातील आदर्श सदस्य म्हणूनही वावरतो. यामुळे विदेशी जातीचे श्वान पाळणाºयांची संख्या वाढत आहे.
दरमहा पाच ते सहा हजार रुपये खर्च पेलूनही याचे संगोपन करण्यात येते. श्वानांचा सहवास मिळाला तर ताणही निघून जातो, असे श्वानप्रेमी अनुभव कथन करतात.
विदेशी पामेरियन, डॅशआॅन, डॉबरमन, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर रिट्रीव्ह, डालमेशन, बुल्डॉग, बॉक्सर, ल्हासा अॅप्सो, कॉकर स्पॅनिअल या जातींचे श्वान सोलापूरच्या उष्ण तापमानामध्ये राहू शकतात. मात्र त्यांची योग्य निगा घ्यावी लागते. त्यांच्यासाठी उन्हाळा किंवा कडक उन्हामध्ये कूलर किंवा एसीची सोय करणे आवश्यक आहे.
या श्वानांच्या संगोपनासाठी विविध तंत्रज्ञानही सध्या बाजारात उपलब्ध असून, खाद्यांचेही अनेक नमुने विकसित करण्यात आले आहेत. यामुळे गावठी जातीला विसरून विदेशी जातीचे श्वान पाळणे आता सोलापुरात सुलभ झाल्याने श्वानप्रेमींची संख्या शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. लॅब्राडोर हा कुटुंब वत्सल असून, डालमेशन बुद्धिमान व प्रसन्न आहे. बॉक्सर जर्मतील जात असून, त्याचा बांधा मजबूत असून, तो चपळ प्राणी आहे.
दीड महिन्याचेच पिल्लू घ्यावे
- - जन्मल्यानंतर तत्काळ श्वानाचे पिल्लू घेऊ नये. कारण त्याला दीड महिन्यापर्यंत आईच्या दुधाची आवश्यकता असते. लवकर घेतल्यानंतर बाहेरून देणाºया अन्नातून त्याला संसर्ग होण्याची अधिक भीती असते. सुरुवातीला दूध, गरम पाणी थंड करून द्यावे. यामुळे पचण्यास मदत होते.
दुर्मिळ जाती
- - श्वानामध्ये काही दुर्मिळ जाती आहेत. त्या विकसित कराव्या लागतात. त्यातील ग्रेट डेन व नेपोलियन मॅस्टिक या जाती आहेत. कारवान ही शिकारी जात असून, डॉबरमन हा पोलिसांचा मित्र आहे, असे पशुचिकित्सक दत्तात्रय केंगार यांनी सांगितले.
उन्हाळ््यात उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित आंघोळ घालणे, खाणे कमी असल्याने पाण्यातून ग्लुकोज देणे, पावसाळ््यात डबक्यातील पाणी पिऊ न देणे व उघड्यावरील अन्न खायला देऊ नये. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हिवाळ््यात त्वचारोग, डँड्रप, सर्दी, खोकला होण्याची भीती असल्याने त्याची निगा राखावी.
श्वानांसाठी ब्रश अन् शॅम्पूही
श्वानांची स्वच्छता राखण्यासाठी साबण, शॅम्पू, ब्रश, खेळणी, आर्टिफिशियल बोन, चोक चेन (कंट्रोल करण्यासाठी), जेवणाचे भांडे, फूड सप्लीमेंट, कंगवा, स्टिव स्टिंग उपलब्ध आहेत. रोज सकाळी या श्वानांना ब्रश करून त्यांना नियमित आंघोळ घालणे आवश्यक आहे, अन्यथा ते आजाराची शिकार बनू शकतात.
गड्या गावठीच बरा
विदेशी जातीचे श्वान आपल्या वातावरणात रमण्यासाठी त्यांची पुरेशी काळजी घ्यावी लागते. मात्र त्या तुलनेत आपले गावठी कुत्रे तंदुरुस्त असल्याने त्यांना तितकी काळजी घेणे गरजेचे नाही. त्यांच्यात प्रतिकारशक्ती जास्त असते. शिवाय मिळेल त्या व शिळ््या अन्नावरही त्यांची गुजराण होऊ शकते. विदेशी जातीच्या श्वानांना मात्र त्यांच्या नियमाप्रमाणेच खाद्य द्यावे लागते, अन्यथा ते आजाराची शिकार बनू शकतात.
श्वान हा इमानदार प्राणी आहे. तो सध्या परिवारातील सदस्यही बनू पाहत आहे. त्याच्या संगोपनाच्या अनेक पद्धती व तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. विदेशी जात सोलापुरात पाळणे थोडे खर्चिक असले तरी गावठी जात या वातावरणाला सूट होऊ शकते. श्वान पाळणे हा एक छंद असला तरी ते आपले संरक्षणही करू शकतात. यामुळे प्रत्येकाने हा छंद जपावा व श्वानप्रेमी बनावे.
- दत्तात्रय श्रीरंग केंगार
पशुचिकित्सक, सोलापूर