जागतिक योग विशेष; १ तास ४८ सेकंद बर्फावर योग ; तासात १०० पेक्षा जास्त आसने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:30 PM2021-06-21T12:30:27+5:302021-06-21T12:31:47+5:30
जागतिक वर्ल्ड बुकमध्ये नोंद
माढा : तालुक्यातील उपळाई खुर्द येथील श्रुती महादेव शिंदे या बारा वर्षाच्या बाल योगी ने सलग १ तास ४८ सेकंद बर्फावर योगा करत वंडर बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपले नाव कोरले आहे. २७ मार्च २०२१ रोजी जागतिक वर्ल्ड बुकमध्ये तिच्या नावावर नोंद झाले आहे. याशिवाय एका तासात १०० पेक्षा जास्त योगासने बर्फावर करत कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील तिची नोंद झाले आहे. उपळाई सारख्या ग्रामीण भागातील बाल योगी ने जागतिक विक्रमाशी गवसणी घालत अखिल भारतीय योगा महासंघाच्या योगा बुक मध्ये विक्रम नोंदवला आहे.
घरातूनच योगाचे बाळकडू मिळालेल्या श्रेया तिची बहीण बाल योगी श्रुती शिंदे यांनी देखील अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. तिच्याकडून प्रेरणा घेत श्रेयाने देखील तिच्या पावलावर पाऊल टाकत योगाकडे आकर्षक होत हे दैदिप्य यश संपादन केले आहे. योगा करण्यासाठी योग शिक्षक प्रवीण बेंडकर व बहीण श्रेया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून दोन ते तीन वेळा सराव करत या जागतिक विश्व विक्रमाशी गवसणी घातली आहे.
आपल्या शरीरावर होणारे परिणाम व दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगा करत होणारे आजार टाळू शकता व शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी दररोज योग केल्यास शरीर तेजदार व प्रसन्न राहतो असून दररोज योगा करणे शरीराला लाभदायक आहे.
-श्रेया शिंदे ,बाल योगिनी