‘सहकारमहर्षी’च्या १० लाख साखर पाेत्यांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:18+5:302021-02-23T04:34:18+5:30

सहकारमहर्षी कारखान्याने आजअखेर ९ लाख ५६ हजार ४५८ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८ हजार १०० क्विंटल ...

Worship of 10 lakh sugar cane of 'Sahakar Maharshi' | ‘सहकारमहर्षी’च्या १० लाख साखर पाेत्यांचे पूजन

‘सहकारमहर्षी’च्या १० लाख साखर पाेत्यांचे पूजन

Next

सहकारमहर्षी कारखान्याने आजअखेर ९ लाख ५६ हजार ४५८ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८ हजार १०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १०.६७ टक्के इतका आहे.

सहवीज निर्मिती प्रकल्पात ८ कोटी २९ लाख ९० हजार २३१ युनिट वीज निर्माण होऊन ५ कोटी १४ लाख ८३ हजार ४४९ युनिट वीज विक्री केली आहे. तसेच ८६ लाख २९ हजार ५४ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट, ५७ लाख ४६ हजार ५८ लिटर इथेनॉल तर ७२७ मे. टन ॲसिटाल्डिहाइड व ७७३ मे. टन ॲसिटिक ॲसीडची निर्मिती झाल्याची माहिती चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, संचालक नामदेवराव ठवरे, लक्ष्मणराव शिंदे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने-देशमुख, विजय माने-देशमुख, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मोहिते, महादेवराव घाडगे, भीमराव काळे, भारत फुले, सतीश शेंडगे, बाबूराव पताळे, रावसाहेब पराडे, मोहित इनामदार, कमल जोरवर, भीमराव रेडे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नितीन निंबाळकर, अमरसिंह माने-देशमुख, रणजित रणनवरे आदी उपस्थित होते. स्वागत एस. पी. पताळे व आर. जे. जगदाळे यांनी केले. जे. एम. माने-देशमुख व ए. आर. शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Worship of 10 lakh sugar cane of 'Sahakar Maharshi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.