सहकार महर्षीच्या ५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:57+5:302021-01-08T05:10:57+5:30
अकलूज : शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी कारखान्यात २०२०-२१ मध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख ५५ हजार ५५५ ...
अकलूज : शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी कारखान्यात २०२०-२१ मध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रकाशराव व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच गॅसवर अधारित ३३ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पात ३ कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक भारत मारुती फुले यांच्या हस्ते झाले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ मधील ५९ वा ऊस गळीत हंगाम २६ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू झाला असून आज अखेर ५ लाख ७२ हजार १४ मे. टन उसाचे गाळप झाले. ५ लाख ७५ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा १०.२३ टक्के आहे. उतारा ११.३८ टक्के इतका आहे. मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील व अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात प्रतिदिन ८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात ५ कोटी २ लाख ४२ हजार २६९ युनिट वीज निर्माण होऊन ३ कोटी १५ लाख ४ हजार ५४७ युनीिट वीज विक्री केली आहे. चालू गाळप काळात उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीत ४९ लाख ९० हजार ११७ लीटर्स रेक्टिफाइड स्पिरीट, ३६ लाख ३६ हजार ४४२ लीटर्स इथेनॉल तर ॲसिटिक प्रकल्पात ५१८ मे. टन ॲसिटाल्डीहाइड व ५७४ मे. टन ॲसिटिकची निर्मिती झाल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
याप्रसंगी संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, सुरेश पाटील, शंकरराव माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, भीमराव काळे, रावसाहेब पराडे, धनंजय एकतपुरे यांच्यासह विनायक कचे, अनिलराव कोकाटे, नितीन निंबाळकर, दिलीप घुले उपस्थित होते.
----
फोटो : ०७ अकलूज
सहकार महर्षीच्या साखर पोत्याचे पूजन करताना प्रकाश पाटील आणि पदाधिकारी.