‘सहकार महर्षी’च्या साडेसात लाख साखर पोत्यांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:40+5:302021-02-05T06:49:40+5:30
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने आजअखेर ७ लाख २९ हजार ८९० मे. टन उसाचे गाळप करून ७ ...
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने आजअखेर ७ लाख २९ हजार ८९० मे. टन उसाचे गाळप करून
७ लाख ५४ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.५१ टक्के आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी १८ लाख ५६० युनीट वीज विक्री केली आहे. उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीत ६४ लाख ७३ हजार ११८ लिटर्स रेक्टीफाइड स्पिरिट, ४८ लाख २९ हजार ७४१ लिटर्स इथेनॉल तर ॲसेटिक ॲसिड प्रकल्पात ७१३ मे. टन ॲसिटाल्डिहाइड व ७६३ मे. टन ॲसेटिक ॲसिडची निर्मिती झाल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, संचालक नामदेवराव ठवरे, धनंजय चव्हाण, विजयकुमार माने-देशमुख, रावसाहेब मगर, राजेंद्र मोहिते, महादेवराव घाडगे, विश्वासराव काळकुटे, चांगदेव घोगरे, भारत फुले, भीमराव काळे, धनंजय एकतपुरे, भीमराव रेडे, अनिल कोकाटे, नामदेव चव्हाण, नितीन निंबाळकर, मारुती घोडके, दिलीप घुले आदी उपस्थित होते.