शाडूचे गणपती घरोघरी; चेहºयावरच्या सुरकुत्या सांगतात शाडूतला ७५ वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:31 PM2020-08-07T12:31:22+5:302020-08-07T12:31:41+5:30

 ‘लोकमत’इनिशिएटिव्ह; आजपर्यंत बनविल्या लाखो मूर्ती; कमाईपेक्षा भक्तांचे समाधानच महत्त्वाचे

The wrinkles on his face tell the story of Shadu's 75 years | शाडूचे गणपती घरोघरी; चेहºयावरच्या सुरकुत्या सांगतात शाडूतला ७५ वर्षांचा इतिहास

शाडूचे गणपती घरोघरी; चेहºयावरच्या सुरकुत्या सांगतात शाडूतला ७५ वर्षांचा इतिहास

Next

सोलापूर : गणेशोत्सवानिमित्त घरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाºया गणेशमूर्ती पर्यावरणपूरकच असल्या पाहिजेत, हा ध्यास घेऊन ८८ वर्षीय धोंडिबा नारायण चव्हाण हे मूर्तिकार वयाच्या बाराव्या वर्षापासून ‘श्री’ मूर्ती घडविण्याची कला जोपासत आहेत. शाडूच्या गोळ्यावर त्यांचे लिलया फिरणारे हात अन् बोटं थक्क करणारे आहेत. 

यंदा ते आपल्या कलेचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. धोंडिबा चव्हाण यांनीे वयाच्या बाराव्या वर्षापासून शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. घरचा परंपरागत व्यवसाय होता; पण वडील मातीला हात लावू देत नसत. शेजारी आणि गल्लीतल्या लोकांच्या घरी बसून गुपचूपपणे धोंडिबा हे गणेशमूर्ती बनवीत असत. १९५२ साली त्यांनी बनविलेल्या शाडूच्या मूर्तीची कलाकुसर पाहून पाच आणे किमतीची मूर्ती सात रुपयांना विकली गेली. त्यानंतर मात्र वडिलांना मुलाची कलेवरील हुकूमत लक्षात आली अन् वडिलांकडून मूर्तिकार होण्यास रीतसर परवानगी मिळाली.

वयाच्या बाराव्या वर्षी जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या धोंडिबा यांनी पीओपीच्या जमान्यातही आपल्या शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याची कला अखंडपणे जोपासत आजतागायत ते कार्यरत आहेत. पूर्वी शहरातील माणिक चौक परिसरात राहणारे हे मूर्तिकार सध्या शेळगीत लहानशा जागेत एकटेच शाडूच्या मूर्ती बनवीत असतात. धोंडिबांचे ग्राहकही शहरातील नामवंत घराण्यातील असून, ते मागील साठ ते सत्तर वर्षांपासून दरवर्षी त्यांच्याकडूनच शाडूची गणेशमूर्ती खरेदी करतात. एक आणि दोन फूट उंचीच्या गणेशमूर्ती ते तयार करतात. त्यासाठी नैसर्गिक पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करतात.

जगण्यातला आनंद मिळतो !
प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी चालू असलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची मागील पंचाहत्तर वर्षांची एकेरी चळवळ आजही चालू असून जोपर्यंत तब्येत साथ देईल तोपर्यंत होईल तेवढ्या प्रमाणात शाडूच्या मूर्ती बनविण्याचे काम करणार आहे. त्यातील कमाईपेक्षा भक्तांचे समाधान हेच मला जगण्यातला आनंद देऊन जाते, असे मूर्तिकार धोंडिबा चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: The wrinkles on his face tell the story of Shadu's 75 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.