यशवंतनगर-संग्रामनगर मिळून अकलूज-माळेवाडी ‘ब वर्ग’ नगर परिषद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:01+5:302021-07-11T04:17:01+5:30
अकलूज, संग्रामनगर, माळेवाडी आणि यशवंतनगर या ग्रामपंचायती एकत्र येऊन अकलूज ही नगर परिषद झाल्यास त्या परिसराच्या विकासासाठी फार मोठी ...
अकलूज, संग्रामनगर, माळेवाडी आणि यशवंतनगर या ग्रामपंचायती एकत्र येऊन अकलूज ही नगर परिषद झाल्यास त्या परिसराच्या विकासासाठी फार मोठी चालना मिळेल. अकलूजच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि जागा या दोन्ही बाबींमध्ये चार ग्रामपंचायती मिळून प्रस्तावित होणारी अकलूज नगर परिषद ही स्वयंपूर्ण होईल. आता नमूद केल्याप्रमाणे केवळ अकलूज आणि माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीची नगर परिषद झाल्यास केवळ एकांगी विकास होऊ शकतो. असे पं.स. सदस्य प्राजक्ता वाघमारे व युवासेना जिल्हाध्यक्ष स्वप्निल वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
चारही ग्रामपंचायतीत भौगोलिक सीमा नाही
अकलूज, माळेवाडी, यशवंतनगर, संग्रामनगर या चारही ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही भौगोलिक अंतर नसून सीमाही नाहीत. केवळ टेंभुर्णी-इंदापूर रस्त्याने त्या विभागल्या आहेत. या ग्रामपंचायतींची पाणीपुरवठा योजनाही एकच आहे. मूळ अकलूज ग्रामपंचायतीच्या वाढीसाठी मर्यादा येत असल्याने येथील नागरिक विविध सेवा देणाऱ्या व्यावसायिक, शिक्षक, नोकरदार, कर्मचारी, नागरिकांना संग्रामनगर व यशवंतनगर येथे राहत आहेत. त्यांची रोजीरोटी ही पूर्णपणे अकलूज हद्दीतच अवलंबून आहेत. संग्रामनगर व यशवंतनगर या ग्रामपंचायतीत अकलूज प्रादेशिक विकास आराखड्याचा भाग असल्याने सुनियोजित विकसित झाला आहे.
कोट ::::::::::::::
नगरविकास मंत्रालयाने अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीसोबत संग्रामनगर व यशवंतनगर या दोन ग्रामपंचायतींचा समावेश करून घेऊन ७५ हजार लोकसंख्या असणाऱ्या बृहद अकलूज नगर परिषद (२७.२१ चौरस कि.मी.) स्थापन होण्यास अंतिम अधिसूचनेमध्ये शासनाने विशेष अधिकार वापर करून समावेश व्हावा, ही विनंती.
- गजानन कीर्तीकर
खासदार, शिवसेना
कोट :::::::::::
अकलूज नगर परिषदेबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यांनी सदर विषयाची पूर्ण चौकशी केली जाईल व अंतिम अधिसूचनेमध्ये यशवंतनगर, संग्रामनगर समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे.
- स्वप्निल वाघमारे
जिल्हाध्यक्ष, युवासेना