यात्रा अनुदानाचा निधी आता सभागृहाच्या बांधकामासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:47 AM2021-09-02T04:47:32+5:302021-09-02T04:47:32+5:30
पंढरपूर नगरपरिषदेची जनरल सभा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सभेला नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा ...
पंढरपूर नगरपरिषदेची जनरल सभा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सभेला नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, अनिल अभंगराव, महादेव भालेराव, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, समिती लिपिक उमेश कोटगिरी उपस्थित होते.
या सभेत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ऑनलाइन लॉटरी पद्धतीने मंजूर झालेल्या ८९२ लाभार्थ्यांच्या निवडीस व पुढील कारवाईस मंजुरी देणे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांनी घरकूल रद्द करण्यासाठी सादर केलेल्या अर्जावर विचारविनिमय करणे, पंढरपूर शहरातील नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात या कामासाठी यात्रा अनुदानातून निधी उपलब्ध करून घेणे, यासाठी सुधारित प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.
पंढरपूर नगरपरिषदेचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याकरिता बिल डेस्क पेमेंट गेटवे व ईबीपीपीएस सेवा कार्यान्वित करणे. पंधराव्या वित्त आयोगातून वेगवेगळी विकास कामे प्रस्तावित करणे. या विषयावर चर्चा करण्यात आली.
----