माचणूरची यात्रा रद्द.. भाविकांनी सिद्धेश्वराचे घेतले लांबूनच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:37+5:302021-03-13T04:40:37+5:30

श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा रद्द झाल्याने भाविकांविना मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ७ च्या दरम्यान माचणूर गावातून ...

Yatra of Machnur canceled .. Devotees visited Siddheshwar from afar | माचणूरची यात्रा रद्द.. भाविकांनी सिद्धेश्वराचे घेतले लांबूनच दर्शन

माचणूरची यात्रा रद्द.. भाविकांनी सिद्धेश्वराचे घेतले लांबूनच दर्शन

Next

श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा रद्द झाल्याने भाविकांविना मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ७ च्या दरम्यान माचणूर गावातून सिद्धेश्वरांची पालखी मंदिरात आणण्यात आली.

प्राचीन काळापासून चालत आलेल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री दिवशी एक ते दीड लाख भाविकांची गर्दी असते. मात्र, यावर्षी यात्रा रद्द केल्यामुळे तालुक्यातून व सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी लांबूनच दर्शन घेतले. कोरोनामुळे ११ ते १५ मार्चदरम्यान मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश डोके, प्रकाश डोके, संतोष कळवणे, तानाजी डोके, सलीम शेख, धनाजी मोरे यांनी केले आहे.

----माचणूरमध्ये पोलीस बंदोबस्त

यात्रेसाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्रीपासूनच बंदोबस्त लावण्यात आला. गुरुवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, सत्यजित आवटे, पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव, ४० पोलीस कर्मचारी, ३ कमांडो व ग्राम सुरक्षा दल असा चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

---

Web Title: Yatra of Machnur canceled .. Devotees visited Siddheshwar from afar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.