मोहोळच्या वीरभद्र देवस्थानची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:07+5:302020-12-27T04:17:07+5:30
मोहोळच्या वीरभद्र देवाच्या यात्रेस सोलापूर जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. श्री वीरभद्र मंदिरात सोमवारी वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष आबासाहेब आंडगे ...
मोहोळच्या वीरभद्र देवाच्या यात्रेस सोलापूर जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. श्री वीरभद्र मंदिरात सोमवारी वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष आबासाहेब आंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागनाथ देवाचे प्रमुख मानकरी राजेंद्र खरगे महाराज, वीरशैव समाजमधील वीरभद्र देवाचे प्रमुख मानकरी स्वप्नील मोळे, भिकलिंग तोडकरी, दादा तोडकरी, सचिन पटणे यांच्यासह वीरशैव कोष्टी समाज राजेंद्र घोंगडे, शशिकांत नरगिडे, नागेश कुपाडे, नंदकुमार तोगारे, वीरमाहेश्वर जंगम समाज उपाध्यक्ष रविकिरण स्वामी, मल्लिकार्जुन हिरेमठ, विजयानंद स्वामी, भीमाशंकर कुर्डे, अशोक फसले इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने हजार होते.
यात्रा उत्सव स्थगित झाला तरी यात्रेनिमित्त दैनंदिन नित्योपचार पूजा, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवारपासून यात्रेस सुरुवात झाली. अभिषेक महापूजा, २८ डिसेंबर रोजी महाप्रसाद, २९ डिसेंबर दत्त जयंती, देवाचे सवाष्ण पूजन होणार आहे.
-----
फोटो. वीभद्रेश्वर