झ्याक झालं यंदा.. लघू प्रकल्पात साठ अन्‌ पाझर तलावात ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:22+5:302021-07-29T04:23:22+5:30

बार्शी : बार्शी तालुक्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली. या जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून ...

This year, 40 per cent water has been stored in a small project | झ्याक झालं यंदा.. लघू प्रकल्पात साठ अन्‌ पाझर तलावात ४० टक्के पाणीसाठा

झ्याक झालं यंदा.. लघू प्रकल्पात साठ अन्‌ पाझर तलावात ४० टक्के पाणीसाठा

Next

बार्शी : बार्शी तालुक्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली. या जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. तालुक्यातील सर्व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पाझर तलावात सरासरी चाळीस टक्के तर मध्यम व लघु प्रकल्पात सरासरी साठ टक्के पाणीसाठा झाला आहे. असाच आणखी पाऊस पडला तर खरीप अन्‌ रब्बी हंगामासाठी ही आनंदाची बाब असेल, अशा भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

तालुक्यात चार मध्यम प्रकल्प व पंधरा लघु प्रकल्पाबरोबरच २३० पाझर तलाव, ११८ केटीवेअर, सहा गावतलाव व जवळपास ६०० सिमेंट बंधारे आहेत. यांची सात टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता आहे. या प्रकल्पांवर २४ हजार हेक्टर बागायती क्षेत्र अवलंबून आहे.

जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक पंधरा लघु, तर चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांवर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना व बागायती शेती अवलंबून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्त्वाचे काम झाले आहे.

----

मध्यम व लघु प्रकल्पाची साठवण क्षमता टक्केवारी

हिंगणी १६०७ - ४० टक्के, जवळगाव- १२३३़१० - ४० टक्के, ढाळेपिंपळगाव - ४१७़१८ - ०९ टक्के, तर लघु प्रकल्पामध्ये पाथरी - ४१९़४७ - ४२ टक्के, बाभुळगाव - २२६ - १० टक्के, कोरेगाव - ८५़५ - ७० टक्के, चारे- ५३़४- ७१ टक्के, वालवड - ४२़४ - ६० टक्के, काटेगाव- ४१़९ - ६० टक्के, कळंबवाडी- ९५़१३- ८० टक्के, ममदापूर- ८९़२५ - ३१ टक्के, गोरमाळे - ६१़६०- ३३ टक्के, कारी - ६०़१०- १८ टक्के, तावडी- ४४़८ - तळपातळीच्या खाली, वैराग - ५१़४०- ६ टक्के याप्रमाणे पाणीसाठा जमा झालेला आहे.

----

बंधारे भरले, तर पाझर तलावात ४० टक्के पाणीसाठा

तालुक्यात लघु पाटबंधारे, कृषी विभाग व जलसंधारण विभाग यांचे पाझर तलाव व सिमेंट बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. लघु पाटबंधारे यांचे ११३ पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे ११० बंधारे आहेत. त्यातील ६५ बंधाऱ्याला पडदी टाकून सिमेंट बंधाऱ्यात रूपांतरित केले आहे, तर २८३ सिमेंट बंधारे आहेत. हे सर्व बंधारे भरले आहेत, तर तलावात सरासरी चाळीस टक्के पाणी जमा झाले आहे. जलसंधारण विभागाचे ११७ पाझर तलाव आहेत, त्यातही ३० ते ३५ टक्के पाणी आहे.

----

फोटो : २८ बार्शी

Web Title: This year, 40 per cent water has been stored in a small project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.