फटाके विक्रीचा यंदा ‘फुसका बार’ सोलापूर शहरातील स्टॉलची संख्या घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:44 PM2018-11-06T12:44:24+5:302018-11-06T12:46:08+5:30

वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश; ग्राहकांनी फिरवली पाठ

This year, the number of stalls in the city of Solapur has decreased | फटाके विक्रीचा यंदा ‘फुसका बार’ सोलापूर शहरातील स्टॉलची संख्या घटली 

फटाके विक्रीचा यंदा ‘फुसका बार’ सोलापूर शहरातील स्टॉलची संख्या घटली 

googlenewsNext
ठळक मुद्देफटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ शाळांमध्ये शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटलेयंदा जागेअभावी स्टॉलची संख्या कमी झाली

सोलापूर : फटाक्यांबाबत एकीकडे न्यायालयाने नियम,अटी घातल्या तर दुसरीकडे स्वस्ताईने बालगोपाळांच्या चेहºयावर आनंद पसरवला आहे़ यंदा फटाक्यांचे दर १६ टक्क्यांनी खाली आले असून, फटाके स्टॉल्सची संख्याही घटली आहे. 

यंदाही सावरकर मैदान, पार्क चौक, कंबर तलाव, अक्कलकोट रोडवर महालक्ष्मी मंदिर आणि सूतमिल, होटगी रोडवर आसरा, विजापूर रोडवर मयूर मंगल कार्यालय, पुंजाल मैदान अशा अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत़ यंदा फटाके स्टॉलची संख्या ही ३०० असून मागीलवर्षी ही संख्या ४०० वर होती़ यंदाही फटाके तामिळनाडूतील शिवकाशी येथून दाखल झाले आहेत.

सुरुवातीला महिनाअखेर, पगारी नसल्याने फटाके खरेदीला सोलापूरकरांचा प्रतिसाद नव्हता; मात्र दोन दिवसात बोनस आणि सानुग्रह अनुदानामुळे सर्वच आस्थापना क्षेत्रातील कर्मचारी मुलांना घेऊन फटाके खरेदीसाठी बाहेर पडले़  सकाळी आणि सायंकाळी या स्टॉलवर ग्राहकांची फारसी गर्दी होताना दिसेनासे झाली आहे. लहान मुलांचा उत्साह शिगेला पोहोचला असून त्यात स्वस्ताईने भर घातली आहे़ पोलीस प्रशासन आणि महापालिकेने स्टॉलना लागणाºया सेवासुविधा आणि परवाने यंदा सहजरित्या उपलब्ध झाल्या; मात्र मोकळ्या जागांअभावी ही संख्या घटली. 
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ शाळांमध्ये देण्यात आले. त्यामुळे त्याचाही परिणाम यंदाच्या फटाके व्यवसायावरही झाला आहे. 

शंभर दुकाने झाली कमी...
- शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटले जातात़ यंदा जागेअभावी स्टॉलची संख्या कमी झाली आहे़ दरवर्षी होम मैदानावर काही दुकाने थाटली जात होती़ यंदा होम मैदानावर सुरक्षा कुंपन उभारण्याचे काम सुरू आहे़ तसेच काही विकासकामेही सुरु आहेत़ त्यामुळे यावर्षी काही ठिकाणी दुकाने थाटता आली नाहीत़ उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शंभर दुकाने कमी झाली़ 

यापूर्वी जीएसटी नसताना विविध कररुपाने फटाक्यांच्यामागे ३५ टक्के रक्कम अधिक भरावी लागत होती़ जीएसटीमुळे कारभार पारदर्शी झाला आणि करात कपात झाली़ आता जीएसटी १८ टक्के असल्याने सर्वसामान्यांना यंदा फटाके स्वस्त मिळत आहेत़ 
- सुनील रसाळे
फटाके विके्रेते

Web Title: This year, the number of stalls in the city of Solapur has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.