पेरणीसाठी यंदा उडदाचाच बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:27+5:302021-06-10T04:16:27+5:30
उडदाचे बियाणे मार्केटमधील दुकानांत शेतकऱ्यांना वेळेत व योग्य किमतीत मिळत आहे. काहीजण चढ्या भावाने बियाणे विक्री करत असल्यामुळे ...
उडदाचे बियाणे मार्केटमधील दुकानांत शेतकऱ्यांना वेळेत व योग्य किमतीत मिळत आहे. काहीजण चढ्या भावाने बियाणे विक्री करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. तालुक्यात खरिपातील पेरणीसाठी उपलब्ध १७ हजार हेक्टर क्षेत्रावर सध्या पेरणी सुरू आहे.
शेतातील मशागतीच्या कामाला सर्वत्र वेग आला असून, नांगरणी, कुळवणी, रोटरणीच्या कामांबरोबरच खरीप हंगामातील पेरणीच्या कामालाही वेग आला आहे. पूर्वीच्या काळात बैलांच्या सहाय्याने मशागतीची कामे केली जात होती. आता ती छोट्या-मोठ्या ट्रॅक्टरद्वारे होत असून, बैलांचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.
---
आठवड्यातील मंडलनिहाय पाऊस
माढा-११.६५मि.मी, टेंभुर्णी-४.३७ मि.मी., कुर्डुवाडी-५.१४. रांझणी-६, दारफळ-२.२, म्हैसगाव-७.४१, रोपळे(क)-६.१, लऊळ-५.२ आणि मोडनिंब ११.३७ मि.मी.
---
पिकनिहाय पेरणी नियोजन अहवाल (हेक्टर)
-पीक प्रकार-सरासरी क्षेत्र-पेरणी होणारे क्षेत्र-सर्व कडधान्य-११६७८-२६७३९, सर्व अन्नधान्य - १६२७४ -३३४४९, गळीत धान्य-८७७- ४१३, एकूण खरीप क्षेत्र-१७१६५ -३३८६७.५, फळबाग लागवड-४१०
----
गेल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने खरिपाच्या पेरणीसाठी वेग आला आहे. यंदा उडदाचे पीक सर्वाधिक पेरणी होत आहे. मात्र उडीद बियाणे मिळण्यास अडचण होत आहे.
दीपक कदम, शेतकरी, घाटणे (ता माढा)
----
तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या जोरात सुरू झाल्या आहेत. यंदा उडीदाची पेरणी जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. परंतू त्या प्रमाणात बियाणे दुकानात उपलब्ध नाही व असल्यास दुकानदार चढ्या दराने त्याची विक्री करीत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. त्यामुळे कोणीही बियाणे चढ्या दराने विकू नये, अन्यथा दुकानावर कारवाई केली जाईल.
- संभाजी पवार, कृषी अधिकारी,पंचायत समिती माढा
०९ माढा१
ओळ-लऊळ परिसरात खरिपात उडीदाची पेरणी ट्रॅक्टरद्वारे करताना चालक सोमनाथ लोकरे व शेतमालक दत्तात्रय कदम.