यंदा कचºयातील ‘सोनं’ हरवलं; सोलापुरातील सफाई कामगार निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:36 PM2020-10-27T12:36:31+5:302020-10-27T12:38:47+5:30

सफाई कामगारही निवांत: ३६.३ टनाने वजन भरले कमी

This year, we lost the 'gold' in the garbage; Sweepers sleeping in Solapur | यंदा कचºयातील ‘सोनं’ हरवलं; सोलापुरातील सफाई कामगार निवांत

यंदा कचºयातील ‘सोनं’ हरवलं; सोलापुरातील सफाई कामगार निवांत

Next
ठळक मुद्देदसºयाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत दोन दिवस आधी मोठ्या प्रमाणावर आपट्याची पाने विक्रीस येतात

सोलापूर: कोरोना साथीमुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दसºयाचं ‘सोनं’ लुटायला शहरातील नागरिक रस्त्यावर न आल्याने यंदा कचºयातील ‘सोनं’ हरविल्याचे दिसून आले आहे.

दरवर्षी दसरा झाला की दुसºया दिवशी महापालिकेला सफाई विभागाची मोठी यंत्रणा कामाला लावून शहरातील रस्त्यावर सांडलेले सोनं (आपट्याची पाने) गोळा करावे लागत असे. पण यंदा तसं घडलंच नाही. सफाई विभागाचे कर्मचारी निवांत होते अशी माहिती सफाई अधीक्षक विजय कांबळे यांनी दिली. दसºयाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत दोन दिवस आधी मोठ्या प्रमाणावर आपट्याची पाने विक्रीस येतात. त्यानंतर दसºया दिवशी ही पाने लुटली जातात. पार्क चौकातील शमीवृक्ष ते मुख्य बाजारपेठेतील रस्ते आपट्याची पानांनी व्यापून गेलेली असतात. त्यामुळे दस?्याच्या सुटीवर असलेले सफाई कामगार दुस?्या दिवशी सकाळी उठून संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवितात. अनेक वर्षांनंतर शहरात प्रथमच अशी स्वच्छता झाली नाही.
सोन्याचंही होतं सोनं

दस?्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात. त्यानंतर दुस?्या दिवशी ही पाने कचरा म्हणून झाडून गोळा केली जातात. हा कचरा महापालिकेच्या खतडेपोला जातो. त्या ठिकाणी ओल्या कच?्यापासून गॅस निर्मिती केली जाते. तेथे ही पाने उपयोगी पडतात. या पानापासून उत्तम कंपोस्ट खत तयार केले जाते.

३६ टनानी कचरा कमी
दरवर्षी दसºयाच्या दिवशी ३०० टन कचरा निघतो. पण यंदा फक्त २६३ टन ७०० किलो कचरा निघाला. ३६ टन ३०० किलो सोनं मिळालंच नाही. याशिवाय पार्क चौक, नवीपेठ, मधला मारूती, टिळक चौक, विजापूर रोड, अक्कलकोट पाण्याची टाकी, जुळे सोलापूर अशा महत्वाच्या बारा ठिकाणी १५ सफाई कर्मचाºयांचे पथक सफाईसाठी पाठवावे लागते. यंदा या कर्मचाºयांना ड्युटी लागली नाही. फक्त टिळक चौकात विक्रीसाठी आणलेल्या पानांचा ढीग तसाच पडून असल्याचे दिसून आले.

Web Title: This year, we lost the 'gold' in the garbage; Sweepers sleeping in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.