मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड; तेराजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:51 AM2018-12-12T11:51:07+5:302018-12-12T11:53:59+5:30

सोलापूर : हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांड्याकडे जाणाºया रोडवर, अंबिका हॉटेलच्या बाजूला असणाºया शेतातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ग्रामीण पोलिसांनी ...

Yoga at Mulegaonan Tanda; In possession of Tejran | मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड; तेराजण ताब्यात

मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड; तेराजण ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल २ लाख २३ हजार १६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्तशेतातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ग्रामीण पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले

सोलापूर : हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांड्याकडे जाणाºया रोडवर, अंबिका हॉटेलच्या बाजूला असणाºया शेतातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ग्रामीण पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३४ हजार १६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शाबाज रफिक शेख (रा.न्यू पाच्छा पेठ, द़ सोलापूर), सलीम रजाक शेख ( रा.नजरेवाडी, सोलापूर), समीर अब्दुलरहीम मुल्ला (रा.जुना विडी घरकुल, सोलापूर), सुनील लिंगप्पा माने (रा.कुर्बान हुसेन नगर,सोलापूर), किरण किसन पुलगम (रा.विडी घरकुल, सोलापूर), देवेन्द्र धनसिंग राठोड (रा. मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर), रफिक मेहबूबसाब शेख (रा. मोमीननगर, सोलापूर), सत्यजीत धनसिंग पवार (रा.मुळेगाव तांडा, द़ सोलापूर), विठ्ठल विजय हंचाटे ( रा. किसननगर, रा. सोलापूर), दिगंबर टोपो राठोड (रा.मुळेगाव तांडा, रा. द़ सोलापूर), भारत बजरंग कोळी (रा.न्यू पाच्छापेठ, सोलापूर), हर्षद अल्लाउद्दीन मुल्ला (रा.जुना विडी घरकुल, रा. सोलापूर), तजमुल अब्दुलमुजिद फुलमामडी (रा. न्यू पच्छापेठ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा एकूण २ लाख २३ हजार १६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Yoga at Mulegaonan Tanda; In possession of Tejran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.