सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी योगिनी घारे यांची निवड!
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 15, 2022 13:05 IST2022-09-15T13:05:13+5:302022-09-15T13:05:53+5:30
विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर विराजमान होणाऱ्या योगिनी घारे या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी योगिनी घारे यांची निवड!
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ उपकुलसचिव योगिनी घारे यांची निवड झाली आहे. गुरुवारी त्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारून सेवेत रुजू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवड प्रक्रियेद्वारे त्यांची निवड केली आहे. गुरुवारी श्रीमती घारे यांनी कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनीदेखील त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.