सोलापुरात विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल
By रवींद्र देशमुख | Published: January 16, 2024 06:22 PM2024-01-16T18:22:49+5:302024-01-16T18:23:12+5:30
सध्या शहरामध्ये मकर संक्रातीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरु आहे.
सोलापूर : शहराच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ड्रोनद्वारे होणारे भविष्यातील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून २९ जानेवारीपर्यंत ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचा अवमान केल्यास कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिला आहे.
सध्या शहरामध्ये मकर संक्रातीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरु आहे. होम मैदानावर महिना अखेरपर्यंत गड्डा यात्रेत हजारो भाविकांची रेलचेल आहे. शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विनापरवाना ड्रोनचा वापर झाल्याचा कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागून शकते. या बाबींचा विचार करुन २९ जानेवारी पर्यंत हा मनाई आदेश काढण्यात आला आहे.
या कलमान्वये होईल कारवाई
परवानगी न घेता ड्रोनचा वापर झाल्यास कलम १४४ (१) (३) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ प्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सदरची नोटीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्शनी भागावर लावावी, असा आदेश बजावला आहे.