तू न थकेगा कभी...तू ना रूकेगा कभी; सोशल मिडियावर तरूणाईचा नवा ट्रेंड

By Appasaheb.patil | Published: May 31, 2020 08:57 AM2020-05-31T08:57:15+5:302020-05-31T09:00:12+5:30

फेसबुकवर पोलिस मित्रांचे फोटो झळकू लागले; पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी नेटिझन्सचा पुढाकार...!

You will never get tired ... you will never stop; A new trend of youth on social media | तू न थकेगा कभी...तू ना रूकेगा कभी; सोशल मिडियावर तरूणाईचा नवा ट्रेंड

तू न थकेगा कभी...तू ना रूकेगा कभी; सोशल मिडियावर तरूणाईचा नवा ट्रेंड

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सोशल मीडियावर नेटिझन्सचा पुढाकारसंचारबंदी काळात महाराष्ट्र पोलीस अहोरात्र बंदोबस्तावरपोलिसांच्या कार्याला सोशल मीडियावरून अनेकांनी केला सलाम

सुजल पाटील

सोलापूर : उन्ह, वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सण, उत्सव, जयंती, आपतकालीन परिस्थितीत अहोरात्र खडा पहारा देत बंदोबस्तावर असलेले पोलीस, तुम्हा आम्हा सर्वांचे रक्षक....लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात बसलेले असतानाही आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेच योध्दे खºया अर्थाने रस्त्यांवर आहेत़  स्वत:चा जीव धोक्यात घालूनही हे पोलिस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र बंदोबस्तावर तैनात आहेत़ त्यांच्या धैर्यामुळेच आपण घरात सुरक्षित आहोत, या खाकी वर्दीतील योध्यांना सलाम करण्यासाठी, त्याचे मनोबल वाढविण्यासाठी आता सोशल मिडियावरील नेटिझन्स सरसावले आहेत़  अनेकांनी आपल्या पोलीस मित्रांचे फोटो फेसबुक, टिटवर, इन्स्ट्राग्रामवर शेअर करून त्यांच्या कार्याप्रती मानसिक बळ देण्याचा प्रयत्न चालविला आहे. 


जगभरात कोरोना या विषाणूजन्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे.  महाराष्ट्रातही कोरोनाने चांगलेच पाय पसरले आहे़  वाढत्या रूग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आला़ याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले़ सर्वकाही बंद असताना लोकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर उभे राहून बंदोबस्तावर तैनात आहे़  बंदोबस्तावर असताना लोकांच्या संपर्कात आलेल्या २ हजार २११ वर पोलीसांना कोरोनाची बाधा झाला आहे़ आतापर्यंत २५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे़ एवढेच नव्हे तर ९७० पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कित्येक पोलीसांना बंदोबस्तावर असताना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यापैकी काहींना जीवही गमवावा लागला. आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची पर्वा न करता हे पोलीस जीव मुठीत धरून सलग २ महिन्यांपासून विनाविश्रांती लोकांसाठी सज्ज आहेत. या अशा पोलीस परिवारातील बांधव एकटे नाहीत हे अधोरेखित करण्याची नितांत गरज असल्याने त्यांची काळजी प्रत्येक नागरिकाचीही आहे. हेच नागरिक पोलिसांप्रती असलेली आपली भावना सोशल मिडियावर फोटो शेअर करून व्यक्त करीत आहेत.
--------------
व्हिडिओ...क़ौतुक अन् बरचं काही....

पोलिस खात्यातील सर्वच मंडळीं कोरोनाच्या काळातही प्रामाणिकपणे सेवा बजावित आहे़ त्याबद्दल सोशल मिडियावरील नेटीझन्सकडून पोलिसांबद्दलचा आदर, सन्मान, मनोबल वाढविण्याचा प्रयत्न होत आहे़ यासाठी काही नेटिझन्सने विविध पोलीस मित्रांचे फोटो एकत्रित करून त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर शेअर करीत आहेत. या एकत्रितपणे बनविलेल्या व्हिडिओला सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
--------------

माझे अनेक मित्र पोलीस खात्यात विविध पदावर काम करीत आहेत. मागील दोन महिन्यांपासून माझे बरेच मित्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर आहेत़ त्यांच्या काळजीपोटी मी नियमित बºयाच मित्रांना फोन करून विचारपूस करतो, याच दरम्यान सोशल मिडियावर बरेच मित्रांनी पोलीस मित्रांचे फोटो शेअर केलेले पाहिले अन् मीही माझ्या काही मित्रांचे फोटो शेअर करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
- सागर संगवे,
विद्यार्थी, वालचंद महाविद्यालय, सोलापूर

------------------
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यंतरी पोलीसांप्रती आपला आदर व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व्हॉटसअपच्या डीपीवर महाराष्ट्र पोलीसांचा लोगो लावण्याचे आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, आता फेसबुकवर पोलीस मित्रांचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ पोलीसांच्या कार्याला आमचा सलाम..!
- सचिन कोलते,
पोलीस मित्र, सोलापूर शहर

Web Title: You will never get tired ... you will never stop; A new trend of youth on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.