कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून

By काशिनाथ वाघमारे | Published: May 6, 2024 09:02 PM2024-05-06T21:02:11+5:302024-05-06T21:02:27+5:30

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न..

young man was murdered in Salgar because he was not we drawing case from court | कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून

कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून

सोलापूर: कोर्टात चालू असलेली केस मागे न घेतल्याचा राग मनात धरून सलगर (ता. अक्कलकोट) येथील एका तरुणाचा दगड व लोखंडी पाइपने मारून निर्घृण खून करण्यात आला. भीमाशंकर श्रीकांत पोलासे (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सोमवार, ६ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अक्कलकाेट उत्तर पोलिस ठाण्यात उमेश मलप्पा पोलासे, सुरेश मलप्पा पोलासे, मलप्पा गणपती पोलासे (सर्व रा. सलगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी सलगर शिवारात श्रीमंत पाटील यांच्या शेताजवळून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आरोपी संगनमत करून आले. आमच्याविरुद्ध तुम्ही केलेली केस काढून घ्या, आम्हाला त्रास होत आहे, केस काढून नाही घेतली तर तुला अन्यथा तुझ्या मुलाला जिवे मारतो, असा दम त्याच्या वडिलास आरोपींनी दिला होता.

कोर्टातून केस काढून न घेतल्याचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा भीमाशंकर यास दगडाने आणि लोखंडी पाइपाने मारून गंभीर जखमी करून जिवे मारले. याबाबत मयताचे वडील श्रीकांत गणपती पोलासे (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक बागाव हे करीत आहेत.
 

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न..
मयत भीमाशंकरचे वर्षाभरापूर्वी लग्न झाले होते. तिची पत्नी गरोदर आहे. तो घरातून शेताकडे म्हशीची धार काढण्यासाठी भाऊ धोंडप्पाला सोबत घेऊन निघाला होता. शेतात गेल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामात गुंतले. याची संधी साधत आरोपींनी त्याच्यावर खुनी हल्ला चढवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: young man was murdered in Salgar because he was not we drawing case from court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.