चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खड्डा चुकविताना रस्त्यावर पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:42+5:302021-07-29T04:23:42+5:30
बालाजी मुरलीधर घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ जुलै रोजी रात्री विष्णू मुरलीधर घावटे पांढरी शिवारातील शेतात ...
बालाजी मुरलीधर घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ जुलै रोजी रात्री विष्णू मुरलीधर घावटे पांढरी शिवारातील शेतात जनावराचा चारा काढण्यासाठी मोटारसायकलवरून जात होता. मधल्यामार्गे शेतातील वाटेवर पावसाने चिखल झाल्याने तो पांगरी चिंचोली मार्गे शेतात जात होता. नीळकंठेश्वरपासून एक किमी अंतरावर तुळजाभवानी हॉटेलपासून काही अंतरावर राज्य मार्गावरील खड्डे चुकविताना मोटारसायकल पडून डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
गावातील अनंत गणपत घावटे, दीपक अभिमान घावटे व मृताचा भाऊ बालाजी मुरलीधर घावटे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता तो जागीच मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत पांगरी पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सतीश कोठावळे करीत आहेत.
---