युवा संशोधक राहुल बऱ्हाणपुरे यांना सोलापूर विद्यापीठाकडून ॲडजंट प्रोफेसर पदाची ऑफर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 18, 2023 02:41 PM2023-05-18T14:41:27+5:302023-05-18T14:41:52+5:30
युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांनी वाहनांमधील टक्के इंधन प्रदूषण कमी करणारा पार्ट विकसित केलेला असून सदरील पार्ट व त्याचे पेटंट टाटा मोटर्सकडून तब्बल साडे तेरा कोटी रुपयांस खरेदी करून सोलापूरचा मान उंचावला आहे.
सोलापूर : युवा संशोधक राहुल बऱ्हाणपुरे यांचे संशोधन सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरणारे आहे. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अथवा ॲडजंट प्रोफेसर म्हणून त्यांना विद्यापीठासाठी काम करण्यासंदर्भात ऑफर देणार आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा, अशी विनंती प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी केली आहे.
युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांनी वाहनांमधील टक्के इंधन प्रदूषण कमी करणारा पार्ट विकसित केलेला असून सदरील पार्ट व त्याचे पेटंट टाटा मोटर्सकडून तब्बल साडे तेरा कोटी रुपयांस खरेदी करून सोलापूरचा मान उंचावला आहे, याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते राहुल बऱ्हाणपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठता डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. विकास पाटील, डॉ. गौतम कांबळे, डॉ. सचिन लड्डा, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अंजना लावंड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे आदी उपस्थित होते.