सोलापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना मिळणार उद्या मानाचा फेटा; लोकमत सरपंच अवॉर्ड्स होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:54 PM2019-03-11T12:54:04+5:302019-03-11T12:55:51+5:30

सोलापूर : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’चे मंगळवारी दुपारी १२ वाजता सोलापूरच्या शिवछत्रपती ...

Your Sarpanchs in Solapur district will be celebrated tomorrow; Lokmat Sarpanch Award Distribution | सोलापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना मिळणार उद्या मानाचा फेटा; लोकमत सरपंच अवॉर्ड्स होणार वितरण

सोलापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना मिळणार उद्या मानाचा फेटा; लोकमत सरपंच अवॉर्ड्स होणार वितरण

Next
ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ११ वाजता रंगभवनात दिमाखदार सोहळा गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’च्या दुसºया पर्वाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद१३ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल

सोलापूर: संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’चे मंगळवारी दुपारी १२ वाजता सोलापूरच्या शिवछत्रपती रंगभवन सभागृहात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. 

गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’च्या दुसºया पर्वाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १३ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची ‘लोकमत भवन’ येथे गुरुवारी झालेल्या जुरी मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली.

 गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व कर्तबगार विजेत्या सरपंचांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. 

गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बीकेटी टायर्स तर पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक आहेत. सलग दुसºया वर्षीही या पुरस्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. 

पुरस्कार प्रदान सोहळा
- मंगळवार, दि. १२ मार्च २०१९ रोजी दुपारी १२ वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी ९०९६८१६८२७ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत संपर्क साधावा.

Web Title: Your Sarpanchs in Solapur district will be celebrated tomorrow; Lokmat Sarpanch Award Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.