तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:22 AM2021-03-16T04:22:54+5:302021-03-16T04:22:54+5:30
माळशिरस नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी गटनेत्यांनी आपापल्या उमेदवारांची बांधणी सुरू केली आहे. मतदारसंघात चाचपणी सुरू ...
माळशिरस नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी गटनेत्यांनी आपापल्या उमेदवारांची बांधणी सुरू केली आहे. मतदारसंघात चाचपणी सुरू झाली आहे. निवडणुकीत अनेक पक्षांचे नेतेेे उतरणार असले तरी प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
विधानसभा, लोकसभेवेळी एका झेंड्याखाली असणाऱ्या नेत्यांचा निवडणुकीत मात्र वेगळा रंग दिसत आहे; मात्र एकमेकांच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या नेतेमंडळींचे नगरपंचायतीच्या निमित्ताने सूत जुळणार का, पक्ष की गट बाजी मारणार, याकडेेे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नाराजांच्या हालचालीकडे लक्ष
मागील नगरपंचायत निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांना संधी मिळाली होती. यावेळी प्रमुख पक्षांची अंतर्गत दुही कायम राहिली तर पुन्हा अपक्षांचा भाव वाढणार आहे. या गटबाजीच्या लढतीत दिग्गजांना धक्का बसून अपक्षांना संधी मिळू शकते. शिवाय सत्तेच्या समीकरणामध्ये वेगळे महत्त्व मिळू शकते. त्यामुळे अनेक बहुतांश वाॅर्डामध्ये अपक्ष उमेदवारीवर अनेक नेते उमेदवारांची बांधणी करीत आहेत. यासाठी बड्या पक्षातील नाराजांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.