युवकांचे योगदान; गाईसाठी भूसा तर कुत्र्यांसाठी बिस्कीटांचा घास...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:56 PM2020-04-25T12:56:09+5:302020-04-25T13:03:06+5:30
मुक्या जनावरांची भूख भागविण्यासाठी धडपड; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
सोलापूर : सध्या लॉकडाउनचा कालावधी सुरू आहे. यामुळे माणसांबरोबर मुक्या प्राण्यांवरही उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे अनेक प्राणी हे भुकेने व्याकूळ झालेले चित्र सध्या दिसत आहे. यामुळे दोन तरुणांना या मुक्या भटक्या प्राण्यांसाठी अन्न देण्याचा चंग बांधला आणि गेल्या आठ दिवसांपासून प्राण्यांना चारादान करण्याचे काम ते करत आहेत.
लॉकडाउन करण्यात आल्यापासून रस्त्यावर फिरणाºया मोकाट जनावरांवरही आता उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे सोलापुरातील अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे या तरुणांनी पुढाकार घेत रस्त्यावरील मोकाट जनावरांना अन्न देण्याचे काम हे सुरू केले आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यांच्या या विधायक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे त्यांनी लगेच कुत्र्यांसाठी त्यांचे खाद्यपदार्थ, पेट फूडस्, तर गार्इंसाठी भुसा खरेदी केला आणि लगेच वाटण्यास सुरुवात केली.
सध्या कोरोना व्हायरसचा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकीकडे अनेकांचे पालक हे मुलांना बाहेर सोडण्यास तयार नाहीत. पण मुलांचा या चांगल्या उपक्रमाला ऋ तिक आणि अनिकेतच्या पालकांनी पाठिंबा दिला. त्यांनीही या उपक्रमामध्ये त्यांना साथ दिली. त्यांनी मागील आठ दिवसांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. ते सकाळी आठ ते सकाळी १० आणि सायंकाळी ७ ते रात्री आठवाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये जनावरांना खाऊ देण्याचे काम सुरू केले आहे. या नावीन्योर्ण उपक्रमाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. शक्यतो हे दोघे मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांना खाद्य देतात. त्यांनी आतापर्यंत नवीपेठ, आसरा चौक, सैफुल, अशोक नगर, बाळी वेस, सरस्वती चौक, आदित्य नगर आदी भागात जाऊन त्यांनी सेवा दिली आहे.
या उपक्रमामध्ये अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे, विनायक सारंगीमठ, स्वप्नजा जाधव, भूषण वडगावकर, ऋ त्विक जेठीथोर, प्रयाग चौधरी हे सहभागी आहेत.
- सहज सुचल्यानंतर आम्ही हा उपक्रम राबविल. याला सर्वंच लोकांनी खूप मदत केली. पण याचबरोबर अनेक ठिकाणी नाकाबंदी आहे. यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला पोलिसांनी अडवले, पण त्यांना आमच्या उपक्रमाची माहिती दिल्यावर त्यांनीही आम्हाला खूप सपोर्ट केला, असे मतही अनिकेत आणि ऋ तिक यांनी व्यक्त केले.
सहज बसल्यानंतर आम्हाला प्राण्यांबद्दल विचार आला. यामधूनच आम्ही त्यांना खाद्य देण्याचा उप्रकम हाती घेतला. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचेही सहकार्य मिळाले. आम्ही व्हॉट्सअॅप माध्यमातून आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पोलीस प्रशासनाकडूनही आम्हाला सहकार्य मिळाले. आता या कार्यातून आम्हाला खूप आनंद मिळत आहे.
-अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे