कुत्रा चावला, उपचार केला पण दुर्दैवानं सोलापूरचा युवक कायमचा निघून गेला
By विलास जळकोटकर | Published: March 21, 2023 04:19 PM2023-03-21T16:19:16+5:302023-03-21T16:19:49+5:30
जर श्वान चावलाच तर वेळीच दक्षता घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन श्वानप्रेमी परिवाराचे अंकुश येळीकर यांनी केले आहे.
सोलापूर : पाच दिवसांपूर्वी गावात कुत्रा चावला.. विष चढू नये म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल करुन उपचार घेतले. डिस्चार्ज घेऊन घरीही गेला मात्र सोमवारी अचानक लघवीचा आणि पोट फुगू लागल्याचं निमित्त झालं पुन्हा दवाखान्यात रात्री ११.३० च्या सुमारास दाखल करण्यात आलं. दोन तासातच प्रकृती चिंताजनक झाली अन् जीव गमावावा लागला. बिभीषण दशरथ तांदळे (वय- ३१, रा. मसले चौधरी, ता. मोहोळ) अस या मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर वन्यजीवप्रेमींनी श्वानांपासून खबरदारी बाळगावी असा सल्ला दिला आहे.
मोहोळ तालुक्यातील नरखेड (ता. मोहोळ) येथील बिभीषण दशरथ तांदळे (वय ३१) हा तरुण काम करीत असताना त्याला १६ मार्च रोजी अचानक एका कुत्रानं डाव्या पायाच्या पिंढरीला चावा घेतला. यावर उपचारही घेतला. मात्र पाच दिवसानंत सोमवारी सकाळपासून लघवीचा त्रास होऊ लागल्याने पोट फूटू लागले. शेवटी रात्री ११.३० च्या खूपच त्रास होऊ लागल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले गात्र तब्येत अधिकच बिघडली अन मध्यरात्रीनंतर सव्वा एकच्या दरम्यान बिभीषणचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुत्र्यांपासून स्वत:ची काळघी घ्यावी, कुत्रा सहजासहजी चावा घेत नाही. तो इनामदार प्राणी आहे. त्यांच्या वाटेला जावू नये, असा सल्ला श्वानप्रेमींकडूृन दिला जात आहे.
श्वान हा इमानदार प्राणी आहे. त्याच्या वाटेला जाऊन नका. त्याच्याशी जीव लावला तर तो प्रत्येकांच्या संकटकाळात धावून येतो. चुकून आपला पाय त्याच्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जर श्वान चावलाच तर वेळीच दक्षता घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन श्वानप्रेमी परिवाराचे अंकुश येळीकर यांनी केले आहे.